विमानांना लागणा-या इंधन निर्मीतीची संजीवनीत चाचपणी करणार-विवेक कोल्हे.
ऊस उत्पादन वाढीसाठी बुलेट व रोख बक्षिसे
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
सहकारी साखर उद्योगासमोर दिवसेंदिवस विविध संकट निर्माण होत आहेत. केंद्र व राज्य शासन त्यासाठी सहकार्य करत आहे, बदलत्या परिस्थितीत निर्माण होणा-या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यांसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जी दिशा दाखविली त्यावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सभासद शेतक-यांच्या मार्गदर्शनांखाली काम सुरू असुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने सहकारात देशात सर्वप्रथम बायो सी.एन.जी. प्रकल्प उभारून त्यातुन उत्पादन सुरू केले आहे, ऊस भावात आपला कारखाना कधीही मागे राहणार नाही अशी ग्वाही युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी दिली. दीडशे रुपये वाढीव दराची घोषणाही त्यांनी यावेळी केली. सहकारी साखर कारखानदारी आर्थीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सभासद शेतक-यांचे प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीबरोबरच आगामी काळात विमानांना लागणारे इंधन तयार करण्याच्या पथदर्शी प्रकल्पावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने काम सुरू केल्याचेही ते म्हणांले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ६३ वी वार्षीक सर्वसाधारण सभा शनिवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे होते.
अहवाल सालात जादा उस उत्पादन घेतलेल्या काशिनाथ रामजी शिंदे करंजी (आडसाली एकरी ७९.४३०), सोमनाथ सुभाष जाधव शहाजापुर (पुर्व हंगामी ७०.८६५), विष्णु शंकर सुराळकर येसगांव (सुरू एकरी ५१.३७८), गयाबाई सुदाम महाले शहाजापुर (खोडवा एकरी ६१.७४२), सुमनबाई निवृत्तीराव कोळपे-कोळपेवाडी (कमी क्षेत्रात अधिक उत्पादन एकरी ९९.४३१) या शेतक-यांसह अवर सचिव किरण शिंदे, वयोवृध्द शेतकरी दशरथ सखाराम वहाडणे व अन्य मान्यवरांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. प्रारंभी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे सर्व संचालक, कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अध्यक्षपदावरून बोलतांना बिपीनदादा कोल्हे म्हणांले की, शेती उत्पादनांसाठी पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. शेतकरी जगला पाहिजे त्याचे उत्पादन वाढले पाहिजे या मुख्य उद्देशासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व स्व. शंकरराव काळे यांनी कधीही सहकारात राजकारण आणले नाही., आपसातील मतभेद बाजुला सारून विकासाच्या प्रक्रियेला साथ दिली आहे. जिल्हयाचे पालकमंत्री हे जलसंपदा मंत्री असुन त्यांनी गोदावरी कालवे नुतणीकरणांत दुजाभाव न करता सर्व कामांना पुर्ण क्षमतेने निधी देवुन उर्ध्व गोदावरी खो-याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे त्यात पाण्याची समृध्दी कशी वाढले याचाच पंचवार्षीक कारकिर्दीत विचार करून येथील शेतीला जास्तीचे पाणी मिळवुन देण्यांवर भर द्यावा असे ते म्हणांले.
विषय पत्रीकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजुर करण्यांत आले. शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन नविदिल्ली संस्थेच्यावतीने बिपीनदादा कोल्हे यांना त्यांच्या साखर कारखानदारीतील आजवरच्या कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार देवुन सन्मानीत केले त्याबद्दल सभासद शेतक-यांच्यावतीने कारखाना संचालक मंडळाने बिपीनदादा कोल्हे यांचा सत्कार केला. त्यांनी हा पुरस्कार माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व कारखान्याचे सर्व सभासद शेतक-यांना समर्पीत केला.
चेअरमन विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, मागील वर्षी देशात २६१ लाख मे.टन साखर उत्पादन झाले त्यात महाराष्ट्र राज्याचा ८१ लाख टनाचा वाटा आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने आगामी गळीत हंगामासाठी ७ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठरविले आहे. एफआरपी रक्कम वाढवितांना केंद्र शासनाने साखर विक्रीबरोबरच इथेनॉल दरात व सहवीज निर्मीती प्रतियुनीट दरात वाढ करावी म्हणजे साखर कारखान्यांना त्यातुन दिलास मिळेल अन्यथा तोटे वाढतच जातील.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदर्शी धोरणामुळे संजीवनीपुढील निर्माण झालेली आव्हाने उपपदार्थ निर्मितीसह उत्पन्नाचे स्त्रोत वाढवुन सोडविली. सभासद शेतकरी, व्यवस्थापन आणि कर्मचारी हे साखर उद्योगाची प्रमुख तीन चाके आहेत त्यांना पुढे नेण्यांसाठी केंद्र व राज्य शासनांने लवचीक धोरणांची अंमलबजावणी करून या उद्योगाला प्रगतीच्या दिशेने घेवुन जावे.
संजीवनीच्या कार्यक्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या मदतींने ऊस उत्पादन वाढीसाठी आपला कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट व शेतक-यांचा सहभाग अशी योजना तयार करण्यांत आली असुन त्यात सर्वांनी सहभाग वाढवावा., एआयच्या मदतींने उत्पादन खर्चात ४० टक्के बचत होवुन उत्पादनही प्रभावीपणे वाढते, सभासद शेतक-यांना अल्पदरात उच्चप्रतीचे सेंद्रिय ग्रॅन्युलेटेड पोटॅशची येथेच निर्मीती करून ते बांधावर पोहोचविले जाईल व खत तयार करणा-या कंपन्यांनाही त्या विक्री करणार असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संचालक सर्वश्री त्र्यंबकराव सरोदे, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, पांडुरंगशास्त्री शिंदे, संजय होन, त्र्यंबकराव परजणे, शिवाजीराव बारहाते, महेंद्र काले, संदिप चव्हाण, प्रदिप नवले, अशोकराव औताडे, राजेंद्र नरोडे, अशोक नरोडे, विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, रमेश घोडेराव, उषाताई औताडे, सोनिया पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, संजीवनी मत्स्य संस्थेचे विजय रोहोम, रिपाईचे दिपक गायकवाड, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाजीराव मांजरे, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.
ऊस उत्पादन वाढीसाठी बुलेट व रोख बक्षिस
उसाची सर्वाधीक लागवड व्हावी यासाठी कोल्हे कारखान्यांने हंगाम २०२५.२६ व २०२६.२७ मध्ये एकशे एक मे. टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांना ७१ हजार रूपये रोख व बुलेट गाडी बक्षिसासह अन्य रोख पारितोषकांची योजना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी जाहिर करताच टाळयांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली. सभेस उपस्थित राहणा-या सभासद शेतक-यांना वाढीव उत्पादन देणा-या ऊसजातींचे वाण, पाच गुंठे क्षेत्रात मत्स्य शेती पालन, यांत्रीक शेतीसाठी अत्याधूनिक ट्रॅक्टर, बायोसीएनजी प्रकल्पाची माहिती देणारे स्टॉल लावण्यांत आले होते त्याची सर्व शेतक-यांनी माहिती घेतली.