येसगाव ग्रामपंचायत ठरली जिल्ह्यात पहिली पेपरलेस ग्रामपंचायत
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायतीने दैनंदिन कामकाजामध्ये महा ई-ग्राम सॉफ्ट प्रणालीचा प्रभावी वापर करत ग्रामपंचायतचे 1 ते 33 नमुना महा ई - ग्रामया अज्ञावाली मध्ये भरून पूर्ण केले या अज्ञावाली मध्ये भरून पूर्ण करत जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान मिळविला आहे.
माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या प्रेरणेने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या येसगाव ग्रामपंचायतने आपले आर्थिक व्यवहार, तसेच विविध प्रकारच्या नोंदी संगणकावर केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने श्रम व वेळ वाचणार आहे. ग्रामपंचायत पेपरलेस होण्यासाठी तालुका समन्वयक नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचचे केंद्र चालक रमेश वाघ यांनी गट विकास अधिकारी (उ. श्रे) संदिप दळवी , विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, बबन वाघमोडे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक महेश आढाव सरपंच, उपसरपंच , ग्रामअधिकारी सिध्दार्थ काळे. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेत जिल्ह्यात पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान मिळवल्या बदल केंद्र चालक रमेश दशरथ वाघ यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच- .पुंडलिक वामन गांगुर्डे उपसरपंच- संदिप अरविंद गायकवाड सदस्य .सचिन दत्तात्रय कोल्हे ,.अमोल दत्तात्रय झावरे , अॅड-उत्तम निवृत्ती पाईक .ज्ञानेश्वर सुभाष आदमने , प्रभाकर सिताराम कळसकर ,अशोक भाऊसाहेब भनगडे, दगडुतात्या दरेकर ,.शंकर रंभाजी पाईक , अतुल ज्ञानेश्वर सुराळकर ,भाऊसाहेब रंगनाथ कळसकर ग्रामपंचायत अधिकारी .सिध्दार्थ भाऊसाहेब काळे यांनी सत्कार केला.






