banner ads

काळे गटाला सुरुंग, खिर्डी गणेश ,धामोरीतील अनेकांचा कोल्हे गटात प्रवेश

kopargaonsamachar
0

 काळे गटाला सुरुंग, खिर्डी गणेश ,धामोरीतील अनेकांचा कोल्हे गटात  प्रवेश 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव मतदारसंघातील खिर्डी गणेश येथिल काळे गटातील काही महत्वपूर्ण कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून पक्षप्रवेश करून कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये दाखल होत पक्षाची ताकद वाढवली. या प्रवेश सोहळ्यात, डॉ. बाळासाहेब कणसे, अमित चिंचपुरे व किरण चिंचपुरे या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे खिर्डी गणेश परिसरातील पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे असे विवेक कोल्हे म्हणाले.
या प्रसंगी साईनाथ रोहम, प्रदीप चांदर, योगेश रोहम, ऋषिकेश जाधव व महेश रोहम हे उपस्थित होते. पक्षात नव्याने सामील झालेल्या कार्यकर्त्यांचे सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

यासह धामोरी येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. काळे गटातील लहू पवार यांनी कोल्हे गटात प्रवेश करून आपला विश्वास दाखविला. धामोरी येथील या प्रवेश सोहळ्यातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी, नंदलाल माळी, गणेश माळी, संजय बर्डे (वेस सोनेगाव), बाळासाहेब गांगुर्डे, ज्ञानदेव औताडे, तसेच विलासराव माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन्ही प्रवेश सोहळ्यांमुळे भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवीन ऊर्जा प्राप्त झाली असून, स्थानिक पातळीवर पक्ष अधिक सक्षम होणार आहे. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सर्व प्रवेश सोहळ्यासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावला असून, पक्षाच्या विचारधारेप्रति निष्ठा व कार्यावरील बांधिलकी अधिक दृढ झाली आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!