banner ads

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य द्या -- मा.आ.स्नेहलता कोल्हे

kopargaonsamachar
0

 शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य द्या -- मा.आ.स्नेहलता कोल्हे 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शासना तर्फे गावच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे.यात नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याने या अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्व सामान्य नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे अशा सुचना मा.आ. स्नेहलता कोल्हे यांनी केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियान अंतर्गत पंधरवडा शुभारंभ येसगाव येथे मा.आ.स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्या प्रसंगी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या यावेळी तहसीलदार महेश सावंत,मंडळाधिकारी मच्छिंद्र पोकळे, ग्राममहसुल अधिकारी अश्विनी निर्मळ, एकात्मिक बालविकास पर्यवेक्षीका श्रीमती गिता देवगुने, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदिप गायकवाड, ग्रामअधिकारी सिध्दार्थ काळे, कपिल सुराळकर, ज्ञानेश्वर आदमाने,अमोल झावरे,दगडू दरेकर, अशोक फनगडे, सतिष गोसावी,शाळेचे मुख्याध्यापक, आशा सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका सह ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की माझं गाव सर्व बाबतीत पुढं गेले पाहिजे यासाठी स्व.शंकरराव कोल्हे साहेबांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने फार मोठे काम करत गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून देत राज्यात गावाची वेगळी ओळख निर्माण करून गावाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले तेच काम आपल्या सर्वांना पुढे चालू ठेवायचे आहे त्यासाठी गाव स्वच्छतेला प्राधान्य द्या असे सांगून  पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बदल येसगाव ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे अभिनंदन केले यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्प्यात दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेचा मा.आ.कोल्हे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येऊन दिव्यांगांना किराणा किटचे वितरण करण्यात आले.उपस्थितांचे  ग्रामअधिकारी सिध्दार्थ काळे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!