banner ads

लोकशाहिर आण्णाभाउ साठे यांनी शाहिरी कलेतुन लोकशिक्षणाचा वसा टिकविला

kopargaonsamachar
0

 लोकशाहिर आण्णाभाउ साठे यांनी शाहिरी कलेतुन लोकशिक्षणाचा वसा टिकविला


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

             लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी कलेतुन लोकशिक्षणाचा वसा संपुर्ण महाराष्ट्रभर टिकवत अनिष्ठ चालीरिती अंधश्रध्दा हददपार करत स्पृश्य अस्पृष्य भेदभाव दुर केला असे प्रतिपादन श्री राजर्षी शाहु महाराज सामाजिक सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बि-हाडे यांनी केले.
 शहरातील पालिकेच्या शाळा क्रमांक ६ व गीता प्रशाला येथील गरीब होतकरू हुशार मागासवर्गीय मुला मुलींना लोकशाहिर आण्णाभाउ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमीत्त राजर्षी शाहु महाराज सामाजिक सेवा समितीच्यावतींने मोफत वहया व शालेय साहित्यांचे सालाबादप्रमाणे याही वर्षी वाटप करण्यांत आले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

प्रारंभी माजी नगरसेवक जंगु मरसाळे यांनी प्रास्तविकात आजवर राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
           शंकर बि-हाडे पुढे म्हणाले की, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे कमी शिकलेले असतांनाही त्यांनी शाहिरी कला आत्मसात केली व त्यातुन समाजहितासाठी सातत्यांने प्रबोधन केले. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम कोपरगांव शहरात त्यांचा पुतळा बसवुन समाजाप्रती व्यक्त केलेल्या भावना लाखमोलाच्या आहे.   आज या पुतळ्याचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले आहे.  त्यांच्यानंतर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मागासवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत शिक्षणातुन हिरे घडविले.
 याप्रसंगी भाजपा शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष जगदिश मोरे, भाजपा किसान आघाडीचे सतिष रानोडे, सुजल चंदनशिव, ज्ञानेश्वर घोडेस्वार, दिपक पुडे, सुनिल वाहुळकर, संजय खरोटे, राहुल भागवत, श्रीमती साळुंके, माणिक कदम सर, सविता इंगळे, सोनवणे ताई, थोरात सर, पाखरेताई, आदि उपस्थित होते. आभार सुजल चंदनशिव यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!