एक राखी जवानांसाठी " उपक्रमात संवत्सरच्या विद्यार्थीनींचा सहभाग
कोपरगाव. ( लक्ष्मण वावरे )
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन -चार वर्षापासून "एक राखी जवानांसाठी " हा उपक्रम दरवर्षी भारत देशाचे सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत शिर्डी ते जम्मु-कश्मीर पर्यंत राख्या संकलन करण्यात येत आहे," एक राखी जवानांसाठी " या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी सहभाग घेऊन ४५० राखींचे शाळे मध्ये संकलन करून खारीचा वाटा उचलला.
संकलन केलेल्या राख्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर बापु परजणे, बापुसाहेब बाराहाते, संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन . राजेंद्र परजणे, कोपरगाव, स्थानिक सल्लागार समिती ज्येष्ठ सदस्य अशोकराव लोहकने, भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष. मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य महेश परजणे, अनिल शेटे, चिमाजी दैने, राजेंद्र नवाळे, प्रकाश बारहाते व संजीवनी कारखाना पीए विभागातील. गणेश कोताडे यांच्या उपस्थितीत सुपुर्त करण्यात आल्या.
या उपक्रमास शाळचे मुख्याध्यापक रमेश मोरे ,पर्यवेक्षक विजय जेजुरकर , ज्येष्ठ शिक्षक . पवन कुमार सांगळे , . भगवान शिंदे , विलास मोरे , श्री. खेताडे , श्री. भोये , श्री. बोडरे, श्रीमती चौधरी , श्रीमती नागरे , श्रीमती महामुनी , श्रीमती म्हस्के , श्रीमती राठोड , यांनी विद्यार्थीनींना विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान शिंदे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार पवन कुमार सांगळे यांनी केले.





