banner ads

पोहेगाव सोनेवाडी चांदेकसारे परिसरात पावसाची हुलकावणी

kopargaonsamachar
0

 पोहेगाव सोनेवाडी चांदेकसारे परिसरात पावसाची हुलकावणी 


पिकांची वाढ खुंटली , शेतकरी हवालदिल 

कोपरगाव (लक्ष्मण वावरे ) 

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव सोनेवाडी चांदेकसारे परिसरात सध्या पावसाने हुलकावणी दिली असून वेळेवर पाऊस पडत नसल्याने पिके सुकू लागली व पिकांची वाढ खुंटली यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शेती पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. 
या परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन मका भाजीपाला कपाशी अदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पिके जोमात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते व औषधावर मोठा खर्च केला मात्र आता पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे. जर चार-पाच दिवसात पाऊस झाला नाही तर संपूर्ण शेती पिकाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज जाणत्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 

मागच्या वर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर पिक विमा ही मिळाला नाही. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कसेबसे पिके उभे केली होती. एकरी पिक उभी करण्यासाठी साधारण पंधरा ते हजार रुपये खर्च येतो. जर ही पिके नष्ट झाली तर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 
गोदावरी उजवा कालवा वाहता झाला असून अजूनही पाटबंधारे विभागाकडून चाऱ्या सुटलेल्या नाहीत. जर कालव्याचे पाणी शेती पिकाला मिळाले तर किमान खरीप तरी शेतकऱ्यांच्या हातात लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधींनी गोदावरी कालव्याचे पाणी शेती पिकांना कसे मिळेल याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या 
पाठीशी उभी राहिले पाहिजे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!