banner ads

संवत्सर येथे शालेय साहित्य वाटप करुन लोकशाहीराला अभिवादन

kopargaonsamachar
0

 संवत्सर येथे शालेय साहित्य वाटप करुन लोकशाहीराला अभिवादन

कोपरगाव  (लक्ष्मण वावरे ) 
साहित्यरत्न  अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त संवत्सर येथील वाघीनाला वस्ताद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रम भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत लोकशाहीराच्या  प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री .काळे  म्हणाले अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा दिली तर माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पहिला पुतळा सर्वप्रथम कोपरगाव येथे स्थापन केला ,त्यांच्या गावी जावुन फोटो मिळवुन पुतळा तयार करून घेतला त्यानंतर कोपरगाव येथे स्थापन केला. इतर ठिकाणी अनेक पुतळे उभे राहिले.परिस्थितीतमुळे अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण जरी कमी झाले मात्र आज सर्व शाळेत त्यांचे चरित्र अभ्यासाला आहे.याचे कारण त्यांचे ज्ञानाची दखल परदेशात देखील घेतली गेली होती असे मत व्यक्त केले.या वेळी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघीनाला ३० विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वही,पट्टी,पेन,पेन्सिल,रबर व अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर आधारीत पुस्तक वाटप केली.या कार्यक्रमाला छाया मुकुंदमामा काळे,मंगल खरे,सोनाली खरे,मोनिका पगारे,वनिता खरे,वस्ताद प्रतिष्ठान संवत्सर विशाल पगारे,राहुल खरे,प्रदीप खरे,रावसाहेब खरे,रामभाऊ खरे,महेफुज शेख,रंगनाथ पगारे,वैभव पगारे,कांतीलाल पगारे,कृष्णा पगारे,भानुदास खरे,दत्तात्रय खरे,साहिल बागुल,सुरज खरे,जीवन खरे,समाधान खरे,समरप्रीत खरे,दिगंबर खरे,कृष्णा खरे,श्रेयस पगारे,संदीप खरे,दिलीप खरे,बाळासाहेब बागुल,जनार्दन पगारे,विशाल खरे आदी ऊपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!