येसगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कोपरगाव ( प्रतिनिधी )
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येसगाव येथे ग्रामस्थांनी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
ग्रामस्थांनी अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्य, लोककला व संयुक्त महाराष्ट्र चळवळ अश्या विविध क्षेत्रांतील अतुलनीय कार्याचं स्मरण करत, त्यांच्यापुढे नतमस्तक होत १०५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले .
यावेळी किरण गायकवाड , अतुल सुराळकर, सागर गायकवाड, उमेश कोकाटे, हनीफ भाई तांबोळी, .नितीन भीवसेन, अशोक कांबळे, .रमेश कांबळे, भाऊसाहेब कांबळे, नंदू कांबळे, किरण निरभवणे, शुभम कांबळे, आकाश कांबळे,.राहुल निर्भवणे, गोरख पोळ, सागर पोळ, रशीद शेख, आकाश पगारे सह ग्रामस्थ ,महिला भगिनी उपस्थित होत्या.





