गोदा-प्रवरा नदी संस्कृतीतुन मानवी उत्क्रांतीचे धडे --- रमेशगिरी महाराज
संजीवनी सांस्कृतिक मंडळाची ३० वर्षांची परंपरा, अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
कोपरगांव / लक्ष्मण वावरे
नद्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असुन त्यातुन संस्कृती बहरली, गोदावरी-प्रवरा नदी संस्कृतीतुन मानवी उत्क्रांतीचे धडे मिळतात, युवानेते विवेक कोल्हे गोदावरी महाआरतीतुन संस्कृती टिकविण्यांचे काम करतात तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यात्म प्रसारात सदैव अग्रेसर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांनी केले. संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे ईश्वर असून त्यांनी मानवाला ज्ञानेश्वरीतुन दैनंदिन जीवनांत उदभवणा-या अडचणी सोडवण्याचा मार्ग दाखविला असेही ते म्हणांले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सांस्कृतिक मंडळ, संजीवनी उद्योग समुह, व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतींने तिसाव्या अखंड ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे हनुमान मंदिरात आयोजन करण्यांत आले त्याचे दिपप्रज्वलनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक सुहास यादव होते. मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते तिस-या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत संजीवनी कार्यस्थळावरील महादेव मंदिराचे भूमिपुजन केले.
प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी प्रास्तविकांत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित केल्या जाणा-या विविध अध्यात्मीक, सांस्कृतिक, धार्मीक कार्याची माहिती दिली.
मठाधिपती रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की, मानवाचे दैनंदिन जीवन तणावांने भरलेले आहे. ते दुर करण्याचा मार्ग अध्यात्म्यातुन जातो. लहान मुला मुलींना शिक्षणाबरोबरच अध्यात्म शिकवा, सकाळ संध्याकाळ गणपती स्तोत्र, हरिपाठ, त्रिकाल संध्या, आरती मुलांनी अगर घरातील कर्त्या पुरुषांनी म्हटलेच पाहिजे. महिला दिवसरात्र कष्ट करतात, अध्यात्मातही त्या पुढेच आहेत. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कष्टातून स्वतःच्या कर्माने संजीवनीचे वैभव फुलविले. त्यांची दुसरी, तिसरी पिढी हे वैभव आणखी यशोशिखराकडे नेण्यांचे काम करत आहे., गेल्या ३० वर्षापासुन या परिसरात ज्ञानेश्वरी पारायणांतुन उर्जा तयार होत आहे असेही ते म्हणांले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना सर्व विभागाचे खाते प्रमुख उपखातेप्रमुख, कामगार, महिला, भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. या ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता १८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भामाठाणचे हभप अरूणनाथगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनांने होणार आहे. सुत्रसंचलन वसंत थोरात यांनी केले तर कामगार कल्याण अधिकारी एस सी चिने यांनी आभार मानले.





