ब्राम्हणगाव येथे अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या फलकाचे उद्घाटन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातीलब्राम्हणगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या फलकाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि काव्याच्या माध्यमातून वंचित, शोषित, आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्या अशा थोर लोकशाहीराच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या मित्र मंडळाच्या फलकाच्या उद्घाटन प्रसंगी ब्राह्मणगावचे
लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले ,उप सरपंच तुकाराम आसने , राहुल सोनवणे ,सारेगाम विजेती गायिका गौरी पगारे ,किरण साळवे ,राजू नीरभवने,हेमंत साळवे ,दिनेश साळवे ,शरद साळवे ,सुरेश साळवे ,मंगेश साळवे ,शंकर थोरात ,समीर खैरनार ,विलास पगारे ,साई साळवे ,रोहित शिंगाडे ,सागर शिंगाडे सह समाज बांधव व ग्रामस्त यांच्या उपस्तितीत हा हा भव्य सोहळा डीजे च्या तालात व फटाक्यांच्या आताशबाजीत पार पडला ..या कार्यक्रमासाठी अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम उत्साहात व शांततेत यशस्वी केला.





