banner ads

गौतममध्ये आमदार क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

kopargaonsamachar
0

 गौतममध्ये आमदार क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न


२० संघानी सहभाग घेतला

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आमदार क्रीडा महोत्सव' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, शाळेचे प्राचार्य नूर शेख, विविध खेळाडू प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, पंच, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

याप्रसंगी बोलताना सौ. चैताली काळे म्हणाल्या की, सध्या मोबाईल, इंटरनेटचा वापर वाढला असून सध्याच्या पिढीचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. मैदानी खेळा अभावी विविध शारीरिक व मानसिक आजार वाढत असून तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गौतम पब्लिक स्कूल मध्ये हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल अशा अनेक खेळांसाठी विद्यार्थ्यांना मैदाने उपलब्ध आहेत. या मैदानावर विद्यार्थ्यांकडून नियमितपणे सराव करून घेवून त्यांना योग्य व अचूक मार्गदर्शन केले जात असल्यामुळे आजवर अनेक विद्यार्थ्यांनी गौतम पब्लिकच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने मैदाने सरावासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी गौतम पब्लिक स्कूलची मैदाने विकसित करण्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

स्पर्धेदरम्यान सहभागी सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी महाराष्ट्र हॉकी क्रीडा संघटनेचे सेक्रेटरी अजीज सय्यद, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे, के. एन. केला हायस्कूलचे प्राचार्य रघुनाथ गायकवाड आदी मान्यवरांनी आमदार क्रीडा महोत्सवास भेट दिली. सदर क्रीडा महोत्सवात राज्यातील नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील हॉकी, क्रिकेट, फुटबॉल व हॉलीबॉल मुली अशा एकूण २० संघानी सहभाग घेतला. फुटबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने पोहेगाव संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. क्रिकेट स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव संघाचा ७ विकेट राखून पराभव केला. हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने संभाजीनगर संघाचा पेनल्टी स्ट्रोक मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलचा सरळ सेट मध्ये २५-१७, २३-२५ व २५-२१ असा पराभव केला.

क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण मीरा भाईंदर नवघर चे पोलीस उपायुक्त सोहेल शेख यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना सोहेल शेख म्हणाले की, गौतम पब्लिक स्कूल नेहमीच उदयोन्मुख खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. शाळेच्या मातीने अनेक खेळाडूंना घडवले असल्याबद्दलचे गौरवोद्गार यावेळी शेख यांनी काढले. विश्वस्त आमदार आशुतोष काळे व सचिव सौ चैताली काळे यांचे उत्कृष्ट प्रशासन व शिस्त यामुळे शाळेची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे अशा शब्दात सोहेल शेख यांनी शालेय प्रशासनाचे कौतुक केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, सर्व हाऊस मास्टर शिक्षक वृंद आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले. तर उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक सौ.रेखा जाधव यांनी केले. पंच म्हणून अकबर खान, रिजवान शेख, जावेद शेख, सुधाकर निलक, रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, दानिश शेख, श्रेया पटारे आदींनी काम पाहिले.

                            

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!