येसगाव येथे "एक राखी जवानांसाठी " रक्षा रथाचे स्वागत
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
संजीवनी युवा प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने २०१९ पासून राबवण्यात येणारा "एक राखी जवानासाठी" हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवणारा आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. या उपक्रमात देशभरातील विविध शाळांमधून विद्यार्थी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या संकलित करून भारतीय सीमांवर कार्यरत जवानांपर्यंत पोहोचवतात.शिर्डी ते श्रीनगर दरम्यान प्रवास करणारा "रक्षा रथ" विद्यालयात दाखल झाला.असता विद्यालयाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या उधळणीत, विद्यार्थ्यांच्या घोषणांत आणि टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार स्वागत करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे विद्यार्थिनींनी मनोभावे तयार केलेल्या राख्या संकलित करण्यात आल्या.या राख्यांसोबत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रके, प्रेमाचे संदेश, आणि देशप्रेम जागवणाऱ्या ओळीही लिहिल्या. विद्यार्थ्यांना ऑपरेशन सिंदूर या अभियानाची माहितीही देण्यात आली.कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक रंगनाथ ठाकरे, स्थानिक स्कूल कमिटी निमंत्रित सदस्य किरण गायकवाड,सल्लागार समिती सदस्य अतुल सुराळकर, पर्यवेक्षिका सौ.जयश्री आंबरे ,शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष. विवेक कोल्हे यांच्यासह सर्व युवासेवकांना शुभेच्छा व अभिनंदन पत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे समन्वयक रामदास गायकवाड, दीपक खालकर .शिवाजी भुतांबे, व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवण्याचे मोलाचे कार्य केले.






