banner ads

श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासी महाराज मंदिर स्थानावर गुरूपौर्णिमा उत्सव

kopargaonsamachar
0

 श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासी महाराज मंदिर स्थानावर गुरूपौर्णिमा उत्सव


 कोपरगांव / लक्ष्मण वावरे

              सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासी महाराज मंदिर स्थानावर १० जुलै रोजी सकाळी १० वाजता गुरूपौर्णिमा उत्सवानिमीत्त हभप अरूण महाराज रोहोम (कारवाडी) यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला आहे.

            डॉ. दिलीप कारभारी झिंजाळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अलका झिंजाळ यांच्या हस्ते लघुरूद्रासह रामदासी महाराजांच्या मुर्तीस महामस्तकाभिषेक संपन्न होईल. गुरू आणि शिष्य या नात्याचे अधोरेखीत करणारी पौर्णिमा म्हणजे गुरू पौर्णिमा होय. महर्षि व्यास हे महर्षि पाराशर व सत्यवती यांचे पुत्र असुन ते जगातील पहिले गुरू आहेत. त्यांनी समाजाला वेदाभ्यास शिकविला. महाभारत ग्रंथ, चार वेद, अठरा पुराणे, श्रीमद भागवत यासह असंख्य ज्ञानभांडार सर्व विश्वाला दिले म्हणून महर्षि व्यासांना विशेष महत्व आहे.   
                         ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी गोदावरी काठी केलेल्या तपश्चर्येतुन योगसाधना करत या परिसरातील अनेक उपेक्षीतांच्या जीवनांत आनंद निर्माण केला. रामदासी महाराज त्यांच्या हयातीत गुरूपौर्णिमा साजरी करत त्यांच्यानंतर कोकमठाण येथील भक्त मंडळ हा उत्सव साजरा करते. किर्तनानंतर महाप्रसाद वाटण्यांत येणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी तन मन धनाने सहकार्य करावे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!