banner ads

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

kopargaonsamachar
0

 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप


कोपरगाव / लक्ष्मण वावरे
 शासनाच्या योजना हे केवळ अध्यादेश नसतात तर ह्या योजना कल्याणकारी सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या संधी असतात.त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते. त्यामुळे अशा योजना पात्र नागरीकांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी वेळोवेळी स्वत:ची यंत्रणा उभी करून आजवर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिला असून शासनाच्या योजना केवळ कागदावरच न राहता ह्या योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल हॉल येथे कोपरगाव मतदार संघातील ६२६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बांधकाम कामगारांच्या योगदानाचे कौतुक करतांना समाजाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. बांधकाम कामगार म्हणजेच आपल्या कोपरगाव मतदार संघाचा भक्कम पाया आहे. त्यांच्या कष्टातूनच भव्य-दिव्य इमारती उभ्या राहतात, रस्ते रुंदावतात आणि प्रगती होते. या कामगारांच्या कष्टाचे चीज व्हावे आणि त्यांचा संसाराचा आर्थिक भार कमी होवून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधने व गृहपयोगी वस्तू महायुती शासनाने उपलब्ध करून दिल्या असून यापुढील काळातही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी महायुती शासन कटिबद्ध आहे. समाजातील अशा अनेक कष्टकरी शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात त्यांच्या पर्यंत पोहोचत आहे आणि यापुढेही शासनाच्या विविध योजना गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत राहतील असे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते तसेच बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!