पाथरवट समाज सेवा मंडळाच्या, वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
कोपरगाव/ लक्ष्मण वावरे
कोपरगाव तालुक्यातील पाथरवट समाजातील १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा नुकताच समता पतसंस्था सभागृह कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अरूण धुमाळ,राजाराम डोंगरे, लक्ष्मण कुडके,नितीन गगे,सचिन लाटे,सिन्नर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष भोपी , प्रा. बाळासाहेब डोंगरे,दिलीप कुडके, माधवराव वाघ,हेमंत भोईर,दत्तात्रय गवळी,नितीन शेलार, सुनिल भगत,यांची उपस्थिती लाभली.प्रा.सचिन गगे यांनी विद्यार्थ्यांना पुढील करीअर साठी मार्गदर्शन केले,मुख्याध्यापीका सौ. राजश्री अनिल टोरपे यांना संघशक्ती नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा समाजाकडून सत्कार करण्यात आला. वृक्ष रोपण व संवर्धनाचा संदेश देत दत्तात्रय गवळी यांनी संस्थेस दोन वट-वृक्ष भेट दिले.
.नितीन आमले,किशोर फुणगे,बाळासाहेब धुमाळ, बाळकृष्ण टोरपे,सुनिल गगे, विलास गगे, प्रसाद धुमाळ, नवनाथ डुकरे,दिनेश भोईर, गौरव आमले,चंद्रकांत केणे, अशोक भगत,मच्छिंद्र खारके,दिपक धुमाळ,ऋषिकेश धुमाळ,विकी टोरपे,सुनिल टोरपे ,युवराज शेरे,सोनल डुकरे,नमिता गगे,मनोरमा गगे,जयश्री आमले आदींसह समाज बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन नंदकिशोर टोरपे प्रास्ताविक ॲड स्वाती मैले व आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेत गगे यांनी मानले




