banner ads

आत्मा मालिकच्या तनिष्क आफळे यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान.

kopargaonsamachar
0

 आत्मा मालिकच्या तनिष्क आफळे यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्या हस्ते सन्मान


कोपरगाव / लक्ष्मण वावरे 
येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या तनिष्क आफळे याने टाटा बिल्डिंग इंडिया निबंध स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. त्याचा नुकताच राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला टाटा बिल्डिंग इंडियाच्या वतीने पालक दत्तात्रय आफळे यांच्यासह तनिष्क आफळे याला दिल्ली विमान प्रवास, निवास, भोजन, राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानपत्र. मेडल, तीस हजारांचे गिफ्ट व्हाउचर देऊन सन्मानित करण्यात आले.
टाटा बिल्डिंग इंडिया आयोजित निबंध स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तनिष्क आफळे यांच्या माध्यमातून आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाला मिळाली हा अभिमानाचा क्षण आहे. असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले विद्यार्थ्यांचे सर्वांगसुंदर, सर्वगुणसंपन्न, व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी आत्मा मालिक सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष .नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले.
या विद्यार्थ्याला विभाग प्रमुख सचिन डांगे, पर्यवेक्षक गणेश रासने, शिक्षक राजेंद्र जाधव, भैरवनाथ कुंभार, रीना पवार, सुवर्णा ढगे, पंकज गुरसळ, विद्या खोसे, मोनाली गोडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाआशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, वसतिगृह व्यवस्थापिका मीरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे यांनी अभिनंदन केले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!