आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगला अभ्यास व मेहनत करुन पुढे जा -डॅा उमेश देशमुख
ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवा.कष्ठ करा यश शंभर टक्के मिळेल.यश म्हणजे फक्त राज्य सेवा व केंद्रिय स्पर्धा परिक्षाच नसुन इतरही अनेक क्षेत्र आहेत त्यात आपले भविष्य घडविता येते. जे करायचे ते मनापासुन करा.फाऊंडेशन करत असलेले काम कौतुकास्पद आहे.आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगला अभ्यास व मेहनत करुन पुढे जा असे प्रतिपादन रांजणगाव देशमुखचे भुमिपुत्र व लोणार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॅा उमेश देशमुख यांनी केले
कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथिल ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन तर्फे दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळा डॉ देशमुख यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रास्ताविकात ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल दरेकर म्हणाले कि,फाऊंडेशन पुणे येथे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहणा-या मुलांसाठी फुटपाथ शाळा हा उपक्रम राबवत आहे.गरजुंना शिक्षणासाठी मदत करणे हे फांऊडेशनचे मुख्य काम आहे.दरवर्षी पोहेगाव परिसरातील गुणवंताचा सत्कार व गरुजुंना शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.
यावेळी बाबुराव थोरात,कैलास रहाणे,बळीराम गव्हाणे,डॅा अरुण गव्हाणे,साईनाथ रहाणे,प्रकाश गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,त्र्यंबक वर्पे,संदिप रणधिर,महेश देशमुख,राजेंद्र थोरात आदिसह विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल दरेकर,उपाध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे,खजिनदार अमोल कोटकर,सचिव गोरक्ष नेहे,सहसचिव राहुल थोरात यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन प्रदिप दरेकर यांनी तर आभार बाबासाहेब नेहे यांनी मानले.





