banner ads

संजीवनी एमबीएच्या तेरा विद्यार्थ्यांना सीटी युनियन बॅन्केत नोकरी

kopargaonsamachar
0

 संजीवनी एमबीएच्या तेरा विद्यार्थ्यांना सीटी युनियन बॅन्केत नोकरी

  वार्षिक  पॅकेज प्रत्येकी रू ५. ०४ लाखाने सुरूवात
कोपरगांव / लक्ष्मण वावरे
 संजीवनी एमबीएच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणीक वर्ष २०२४-२५ च्या  एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी सीटी युनियन बॅन्केच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने तेरा विद्यार्थ्यांची प्रत्येकी वार्षिक  पॅकेज रू ५. ०४ लाखांवर नोरीसाठी निवड केली आहे. संजीवनी एमबीए ला ऑटोनॉस दर्जा प्राप्त असल्यामुळे संजीवनी एमबीएचे विद्यार्थी अनेक आस्थापनांच्या कसोट्यांमध्ये  होत आहे, अशी  माहिती संजीवनी एमबीए प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

        सीटी युनियन बॅन्केने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सतीश  किसन आहेर, ज्ञानेश्वरी  काकासाहेब बारहाते, माधवी गणेश  फुंदे, शुभम  विक्रम कदम, संकेत सदाशिव  काडे, जयदीप अनिल कासार, अजिंक्य बंडू मालकर, कृष्णा  पंढरीनाथ पानसरे, अनंता यशवंत परदेशी , अभिषेक  संजय परजणे, साई रविंद्र पाटील, शुभम शिवाजी  रक्ताटे व निखिल रमेश  साळुंके यांचा समावेश  आहे.
        संजीवनी एमबीएला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे वेगवेगळ्याा आस्थापनांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांकडून मुलाखतीची तयारी करून घेतल्या जाते. यामुळे विद्यार्थ्यांची नोकरीसाठी सहज निवड होते. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!