banner ads

पर्यावरण संतुलन राखणे माणसाच्या हातात... संदीप घाट

kopargaonsamachar
0

 पर्यावरण संतुलन राखणे माणसाच्या हातात... संदीप घाट


 गुजरात येथील जे के पेपर कंपनीच्या अधिकाऱ्यांची सोनेवाडी शाळेला भेट 

कोपरगाव / लक्ष्मण वावरे

 परिवर्तन आणि निसर्गाचा नियम असतो. झाडे लावली पाहिजे ती जगवली पाहिजे तिचे संगोपन झाले पाहिजे. जेके पेपर लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ऊस शेतीला पर्याय म्हणून सुबाभूळ लागवड केली जाते. यामुळे पर्यावरण संतुलन राखले जाते तसेच शेतकऱ्यांना रोटेशन पद्धतीने उत्पन्न देखील मिळते. सर्वसामान्य शेतकरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांची नाळ जुळलेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी परिपूर्ण असतात.येथील दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर अनेकांनी आपले नाव देशाच्या कानाकोपऱ्यात कोरले आहे.असे प्रतिपादन गुजरात येथील जेके पेपर लिमिटेड कंपनीचे सहायक व्यवस्थापक संदीप घाटे यांनी केले. 

ते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. जे के कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोनेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची हितगुज केले. 
यामुळे जेके कंपनीचे व्यवस्थापक प्रमोद चौधरी, सेंटर इन्चार्ज शैलेंद्र दुबे, फिल्ड ऑफिसर नवनाथ गुडघे, निरंजन गुडघे, आनंदराव जावळे, आबासाहेब जावळे, बबलु जावळे, सोमनाथ रायभान, लक्ष्मण जावळे, आदिनाथ जावळे, शाळेचे शिक्षक मनोहर वहाडणे, सुरेश धनगर, चंद्रविलास गव्हाणे, बजरंग भागवत,
 सौ कविता पानसरे, प्रीती दहे,अदी उपस्थित होते.
आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तालुक्यातील संपूर्ण शाळेला मोफत व यांचे वाटप करत कोल्हे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे. बिपिनदादा कोल्हे यांनी उपलब्ध करून दिलेल्या वह्याचे वाटप जेके कंपनीचे व्यवस्थापक प्रमोद चौधरी व आनंदराव जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले तर मनोहर वहाडणे यांनी मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!