banner ads

संजीवनी पॉलीटेक्निकच्या ३०९ विद्यार्थ्यांना नोकऱ्या

kopargaonsamachar
0

 संजीवनी पॉलीटेक्निकच्या ३०९ विद्यार्थ्यांना नोकऱ्या 


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाने  व इतर विभाग यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील अंतिम वर्षातील  सिव्हिल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग व कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी शाखेतील  तब्बल ३०९ विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच २५ पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्यात आल्या. यात इटॉन कंपनीने सर्वाधिक म्हणजे रू साडेपाच लाखांचे वार्षिक  पॅकेज दिले. वयाच्या १९ व्या वर्षी  विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न संजीवनीने पुर्ण केले आहे, अशी  माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

       पत्रकात पुढे म्हटले आहे की इटॉन, ब्ल्यु स्टार, अलस्टेफ ग्रुप, आरडीसी कॉन्क्रीट, मायडीया, बजाज, रिंग प्लस अक्वा, ओईएन, थर्म्यक्स, एल अँड  टी डीफेंस, शारदा  मोटर्स, बीगॉस ऑटो, सेंट गोबिन, आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स, आद्याम एनर्जी सोल्युशन्स, थॉट ब्लिस, बगबॅटलर प्रा. लि., इत्यादी कंपन्यांचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक कंपनीच्या ड्राईव्हच्या अगोदर टी अँड  विभागाने व संबंधित विभागाने कंपनी निहाय विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचा सराव करून घेतला. यामुळे विद्यार्थी सहजरित्या नोकरीसाठी निवडल्या गेले.  
       माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी १९८२ साली  मोठ्या शहरात पॉलीटेक्निक सुरू न करता कोपरगांव सारख्या ग्रामीण भागात ते सुरू केले. कारण ग्रामीण भागातील मुलं मुली शिकून  स्वावलंबी व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते. संजीवनी पॉलीटेक्निकने नामांकित कंपन्यांची गरज शोधुन आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे अधिकचे प्रशिक्षण  दिले. यातुन दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळत आहे. संजीवनी वर्षभर  कृती आराखड्यानुसार विविध उपक्रम राबविते . यातुन ‘संजीवनी पॅटर्न’ उदयास आला. या पॅटर्नमुळे कोणतीही स्पर्धा असो, परीक्षा असो, आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवुन देणे असो अथवा एखादे मानांकन मिळविणे असो, यात संजीवनी पॉॅलीटेक्निक नेहमी अग्रभागीच असते, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
      संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थीं, त्यांचे पालक, प्राचार्य ए. आर. मिरीकर, टी अँड  पी विभाग प्रमुख प्रा. आय. के. सय्यद व सर्व विभाग प्रमुख यांचे अभिनंदन केले आहे.          
  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!