कै. सखाहरी दवंगे यांचे निधन
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील मळेगांवथडी येथील प्रगतशिल शेतकरी सखाहरी किसनराव दवंगे (८८) यांचे निधन झाले त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. कोपगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. साहेबराव दवंगे यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थीवावर कोपरगांव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले.
कै. सखाहरी दवंगे यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकुर, आदिंनी शोक व्यक्त केला.




