मराठा समाजाला लग्न सोहळ्यासाठीच्या आचार संहितेचे मराठा भगिनींकडून स्वागत
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
मराठा समाजाच्या लग्नासाठी समाजातील विचारवंतां कडून एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिजेच्या तालावर, अश्लील गाणी व संगीताच्या तालावर नाचणारे युवक युवतींना समज द्यावी. भोजनातील पदार्थांची संख्या मर्यादित असावी. वधु -वर पित्यांशिवाय इतरांना फेटे न बांधने, अनावश्यक सत्कार सोहळे बंद व्हावेत. वरमाला घालतांना वधुवरांना न उचलणे तसंच लग्नाचा अव्वाच्या सव्वा खर्च टाळणं, हुंडा न देणं, हुंडा घेणाऱ्यावर बहिष्कार टाकणं आणि सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं अशा प्रकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
हे सर्व नियम व घालून दिलेल्या आचारसंहितेचा सर्व विभागात सन्मान राखावा असे आवाहन मराठा समाजातील भगिनींनी सर्व समाज बांधवांना केले आहे.
ही लग्नासाठीची आचारसंहिता एक चळवळ म्हणून उभी करण्याचा मानस योग शिक्षिका विमल पुंडे यांनी व्यक्त केला आहे.
विमल पुंडे, रोहिणी पुंडे, कमल नरोडे, आरती गाडे, मंगल खोकले, रुपाली महाडिक, शिल्पा पुंडे, संगिता नरोडे, पुष्पा जगताप, कल्पना मोरे, पुनम रक्ताटे, सोनल हिरे आदी मराठा भगिनी यासाठी प्रयत्नशील आहेत.





