ब्राम्हणगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील शिवाजी माधव आसणे व शिवाजी सिताराम येवले यांच्या शेळ्यांवर रात्री बिबट्याने जोरदार हल्ला केला या हल्ल्यात शेळी व दोन बोकड ठार झाले या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्राम्हणगाव- रवंदे रोड वाकचौरे ,आसणे वस्ती ब्राम्हणगाव शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार असून अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांची पाळीव कुत्री व जनावरे फस्त केली आहेत.या भागात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांच्या मृत शेळ्यांचा पंचनामा करुन त्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शिवसेना पदाधिकारी सचिन आसणे सह ग्रामस्थांनी केली आहे






