banner ads

समाजमनांच्या वेदनांची मांडणी करणारी लेखनी हरपली-कोल्हे

kopargaonsamachar
0

 समाजमनांच्या वेदनांची मांडणी करणारी लेखनी हरपली-कोल्हे



कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )


          अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व कोपरगांव येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दगडोबा रासकर यांच्या निधनांने समाजमनांच्या वेदनांची मांडणी करणारी लेखनी हरपली अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.

         ते पुढे म्हणाले की, सध्याचे समाजमाध्यम तंत्र विकसीत होण्याच्या अगोदर कै. सुरेश रासकर यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कोपरगांव शहरासह तालुक्याच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यांसाठी वर्तमानपत्रातुन बातमीदारीच्या माध्यमांतुन प्रतिबिंब उमटविले. गुरू नरेंद्र महाराज नान्नीज अध्यात्मक्षेत्रातही त्यांनी काम केले होते. तरूण युवापिढीचे पत्रकार घडविण्यांत त्यांनी मोठे योगदान दिले. शेतकरी शेतीपाट पाण्याच्या प्रश्नावर माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रत्येक संघर्षाची मांडणी त्यांनी केली होती. त्यांच्या निधनांने व्यासंगी पत्रकार हरपले. माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही कै. सुरेश रासकर यांच्या निधनाबददल शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!