banner ads

काकडी येथील गुंजाळ, सोनवणे यांचा भाजपामध्ये प्रवेश

kopargaonsamachar
0

काकडी येथील गुंजाळ, सोनवणे यांचा भाजपामध्ये प्रवेश


आम्ही जिथे गेलो तिथे अतिशय दिशाभूल करणारा कारभार - गुंजाळ

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
काकडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराज गुंजाळ, त्यांचे दोन्ही मुले अर्जुन गुंजाळ आणि संदीप गुंजाळ तसेच साखरबाई विश्वनाथ सोनवणे यांनी काही महिन्यांपूर्वी काळे गटात प्रवेश केला होता. त्यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत पुन्हा माघारी परतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे आगामी काळात काकडी गावाच्या विकासासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एक नवे पाऊल टाकले गेले आहे. या प्रसंगी, विवेक कोल्हे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन, पुढील वाटचालीसाठी काकडी गावाच्या समृद्धीसाठी योगदान देण्याची शुभेच्छा व्यक्त करत जोमाने संघटना वाढीसाठी काम सुरू करावे कारण काही काळ जरी कुणी दिशाभूल केली असेल तरी तुम्ही पुन्हा योग्य ठिकाणी आलेला आहात त्यामुळे निश्चितच आगामी काळात अधिक सक्षमपणे वातावरण दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी, चंद्रभान पा. गुंजाळ, साई संजीवनी सह. बँकेचे संचालक नानासाहेब गव्हाणे, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, राजेंद्र भालेराव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

गुंजाळ कुटुंबाने बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलता कोल्हे,युवानेते विवेक कोल्हे यांनी नेहमी जनतेच्या विकासाचा विचार केला आहे.पुन्हा आमच्यावर विश्वास दाखवला आहे.गेले काही काळ मात्र आम्ही जिथे गेलो होतो तिथे अतिशय दिशाभूल करणारा कारभार आणि अक्षरशः निराशाजन्य स्थिती आहे. काळे गटात गेल्यानंतर आमचा काहीच दिवसात भ्रमनिरास झाला आहे त्यामुळे आम्ही पुन्हा निर्णय घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करतांना "आम्ही पुन्हा आमच्या घरी परतलो आहोत" अशी भावना व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!