banner ads

दरोडा टाकून लुटलेले सोने पोलिसांनी महिलेस दिले परत

kopargaonsamachar
0

 दरोडा टाकून लुटलेले सोने पोलिसांनी महिलेस दिले परत 


पाच जणांवर कारवाई दरोड्याचा लावला तपास.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील संदीप बोळीज व चित्रा संदीप बोळींज हे  दि. ७ मे २०२५ रोजी रात्री ९च्या सुमारास  नातेवाईकांच्या येथील कार्यक्रम आटपून वैजापूरहून मोटारसायकल ने कोपरगावला येत असताना अज्ञात पाच जणांनी त्यांची गाडी आडवून चित्रा बोळींज यांच्या गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळील  सोन्याचे दागिने व मोबाईल घेऊन पळून गेले होते याबाबत बोळींज यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता 

याबाबत अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्ह्या शाखेतील पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एकूण पाच आरोपी यात राहुल केदारनाथ लोहकने वय 20 कोकमठाण,,  कुणाल अनिल चंदनशिवे वय 19 राहणार संवत्सर,,  निलेश बाळासाहेब भोकरे वय 19 राहणार  संवत्सर ,, प्रमोद कैलास गायकवाड  वय १९ रा संवत्सर व एक अल्पवयीन आरोपी असे या दरोडेच्या तपासात निष्पन्न झाले होते
 पुढील कारवाईसाठी सदर आरोपी हे तालुका पोलीस पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याकडे  हस्तांतरित करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींनी चोरलेला मुद्देमाल हास्तगत करत. चोरलेला मुद्देमाल हा बोळीज यांचा असल्याचे खातरजमा करत आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करून आज सदरचा मुद्देमाल हा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस उपनिरीक्षक संदीप चौधरी यांच्या हस्ते बोळीज दांपत्याच्या स्वाधीन केला. 
यावेळी चित्र बोळींज व संदीप बोळींज यांच्या चेहऱ्यावर चोरीला गेलेले सोने व मोबाईल परत मिळाल्याचा आनंद यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!