साईधामचा १६ जुन रोजी सव्वीसावा वर्धापनदिन
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
साईभक्त, वाचस्पती धोंडीरामबाबा चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शहरालगत असलेल्या नगर मनमाड महामार्गावरील अंबिका धोंडीबानगर येथील साईधाम मंदिराचा सव्वीसावा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सालाबादप्रमाणे याही वर्षी १६ जुन रोजी साजरा होत असुन त्यानिमीत्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई करून फुलांची भव्य सजावट केली जात आहे.
महाराष्ट्रासह देश विदेशातील असंख्य साईभक्त धोंडीबाबा चव्हाण यांचे शिष्य असुन अंबिकानगर साईधाम परिसरात स्व. धोंडीबाबा चव्हाण यांनी स्वतः परिश्रम घेत भव्यदिव्य साई मंदिराची उभारणी करत मनोकामना वृक्ष, ध्यानसाधना केंद्र, अन्नछत्र आदि उभारणीमुळे नयनरम्य धार्मीक वातावरणाच्या निर्मातींन साईभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य व मठाधिपती रमेशगिरी महाराज, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिध्द ड्रमवादक पदमश्री पुरस्कार प्राप्तकर्ते शीवमणी, साईभक्त सुमीत पोंडा, गझलगायक राजेश कुमार, दिल्लीचे नागर बंधु, चंदीगढच्या सोनाक्षी महंत सिमरन महंत, नविदिल्लीचे लाईव्ह पेंटिंग आर्टिस्ट साईरतन राजेश आदि साईभक्त गेल्या २५ वर्षापासुन धोंडीबाबा साईचरणी भजनसेवेसह अन्य धार्मिक सेवा देत आहेत. शिर्डी पंचकोशीतील साईभक्त नित्यनेमांने येथे दर्शनासाठी येतात. यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यांने विशेष आकर्षण साईमंदिरावर करण्यांत आले आहे. साईभक्त धोंडीबाबा चव्हाण हे वाचस्पती होते त्यांनी असंख्य भक्तांच्या इच्छा पुर्ण केल्या त्यामुळे देश विदेशात त्यांचा मोठा शिष्यपरिवार आहे.






