banner ads

कोपरगांव कृषि उत्प़न्ऩ बाजार समितीची ५०० कोटीचे वर आर्थिक उलाढाल

kopargaonsamachar
0

 

कोपरगांव कृषि उत्प़न्ऩ बाजार समितीची ५०० कोटीची उलाढाल

५ कोटी उत्पन्ऩ – शेतमालाची आवक वाढली सभापती –  साहेबराव  रोहोम
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कृषि उत्प़न्ऩ बाजार समिती कोपरगांव मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५०० कोटीचे वर आर्थिक उलाढाल झाली असुन बाजार समितीला ५ कोटीचे उत्प़न्ऩ झाले  आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्प़न्ऩ व नफा झाला मा. आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, आमदार  आशुतोष काळे, .विवेक कोल्हे तसेच . राजेश परजणे व. नितीन औताडे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सभापती  साहेबराव. रोहोम, उपसभापती. गोवर्धन परजणे यांचे अधिपत्याखाली संचालक कार्यरत असुन ते शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकरी बांधवांना सर्व सुविधा उपलब्ध़ करुन देण्यासाठी सदैव तत्प़र असल्याची माहीती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

 बाजार समितीच्या मुख्य़ मार्केट मध्ये व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतक-यांचे शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी इतरत्र न जाता येथेच आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. कोपरगांव तालुक्याबरोबरच शेजारील वैजापुर, राहाता, येवला, श्रीरामपुर व सिन्ऩर या तालुक्यातील शेतकरी बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणतात. सन २०२४-२५ या वर्षात २१ लाख क्विंटल आवक झालेली आहे. तसेच उपबाजार आवार मोर्विस धामोरी फाटा या ठिकाणी लवकरच कांदा व भुसार लिलाव सुरू होणार असुन संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पध्दतीने सुरू असुन शेतकरी, व्यापारी व सर्व बाजार घटकांसाठी जास्तीत जास्त़ सुविधा उपलब्ध़ करून देणार आहे. बाजार समितीचे शासनाकडून लेखापरिक्षण झाले असुन समितीला अ वर्गाचा दर्जा मिळालेला आहे. बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी प्रयत्ऩ करणार आहे,अशी माहिती बाजार समितीचे सभापती .साहेबराव रोहोम व उपसभापती. गोवर्धन .परजणे यांनी दिली आहे. 

बाजार समितीने शेतक-यांसाठी खालील सुविधा उपलब्ध़ करुन दिलेल्या आहेत.
१ कोपरगाव बाजार समिती डिजीटल - शेतक-यांचे हित लक्षात घेता संचालक मंडळाने बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनीक प्रणालीचा वापर करुन बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाची लिलावापूर्वी ऑनलाईन नोंद होवून लिलाव झाल्यावर वजन होताच शेतक-याला शेतकरी,मापाडी, खरेदीदार यांचे नावासह व्यवहाराची संपुर्ण माहिती व्हाट्सॲप वर मिळत आहे. यामुळे कोपरगांव बाजार समितीचा करभार हायटेक व पारदर्शी झालेला आहे. यामुळे शेतक-यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर शेतमालाला मिळालेला भाव समजतो. या बंतोष प्रणालीच्या माध्यमातुन पावत्या बनवणे आणी त्याचे रेकॉर्ड आनलाईन ठेवणे सोपे जाते. तसेच वेळ, पैसा, मनुष्य़बळ आदीची बचत होत असल्याने हि प्रणाली फायदेशीर आहे. यामुळे बाजार समितीचे व्यवहार डिजीटल झालेले आहे. शेतमाल विक्रीच्या दिवशीच शेतक-यांना रोख पेमेंट दिले जाते.
2)हमीभाव योजना - केद्र शासनाच्या हमीभाव योजनेची अंमलबजावणी कोपरगांव बाजार समितीमध्ये करण्यात आलेली असुन एकुण 544 शेतक-यांची 8,590 क्विंटल सोयाबीन हमीभाव दर रूपये 4,892/- ने खरेदी केली असुन शेतक-यांच्या खात्यात रूपये 4,20,22,280/- जमा झालेली आहे.
3)शेतमाल तारण कर्ज योजना – महाराष्ट्र राज्य़ कृषि पणन मंडळ पुणे यांचे अंतर्गत कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांव मार्फत शेतकरी वर्गास 6% व्याजदराने सोयाबीन, गहु, तुर व हरबरा हा शेतमाल तारण घेवुन शेतमाल तारण कर्ज त्वरीत दिले जाते. सदरची योजना प्रभावीपणे राबविणेसाठी बाजार समितीने 1000 मे.टनाचे गोदाम बांधकाम पुर्ण झालेले आहे.
4)कांदा या शेतीमाल विक्रीचे रोख पेमेंट – कांदा शेतमाल विक्रीनंतर बाजार समितीच्या आवारात एकाच छताखाली सर्व व्यापारी वर्ग शेतक-यांना त्वरीत रोख पेमेंट देतात.
5)मुख्य़ मार्केट यार्डमधील विकास कामे
    1. मेन रस्ता वेअर हाऊस गेट पर्यंत काँक्रीटीकरण काम सुरू आहे.
    2. 100टनी इले.वजनकाटा बसविला असुन कार्यान्वित आहे.
    3. यशवंत शॉपींग सेंटर इमारत नं. 1 व 2 मधील रस्ता काँक्रीटीकरण झालेले आहे.
    4.कांदा लिलाव उर्वरित जागेचे काँक्रीटीकरण 8 दिवसात सुरू होणार आहे.
    5.शेतकरी पेमेंट एकाच छताखाली रोख देणेकरीता हॉल तयार केला आहे.   
    6.1000 मे.टन गोदाम बांधकाम पुर्ण झाले आहे.
     7.ऑनलाईन काटापट्टी हिशोब पट्टी सॉफ्टवेअर सुरू केलेले आहे.
     8.शेतक-यासाठी नविन शेतकरी भवन बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
      9.सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.
      10.बाजार समितीची वेबसाईट सुरू करण्यात येवून त्यावर कांदा व भुसार लिलाव तसेच बाजारभाव       
          व इतर सर्व माहिती दररोज अपलोड करण्यात येणार आहे.
     11.ई-नाम मध्ये सहभाग- केंद्र शासनाचा राष्ट्रीय कृषि बाजार ई-नाम ही देशपातळीवरील बाजार
         व्यवस्था आहे. यामध्ये कोपरगांव बाजार समितीचा लवकरच समावेश होणार आहे.
6)उपबाजार आवार तिळवणी येथे बाजार समितीने कांदा लिलाव जागेचे कॉक्रीटीकरण, टॉयलेट ब्लॉक तसेच पार्किंगची जागा मुरूमीकरण आदी विकास कामे केलेली आहेत. शेतक-यासाठी जार व्दारे पिण्याचे पाण्याची व्यवस्था तसेच स्ट्रीट लाईट व वृक्षारोपन केलेले आहे तसेच ऑनलाईन काटापट्टी हिशोब पट्टी सॉफ्टवेअर सुरू केलेले आहे. लवकरच त्याठिकाणी पेट्र्रोलपंप व उर्वरित कांदा लिलाव जागेचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार आहे.   
7)भाजीपाला मार्केट येथे बाजार समितीने 110×50 साईजचे शेतकरी भाजीपाला लिलावाकरीता सेल हॉल बांधकाम पुर्ण केलेले असुन भाजीपाला धुण्यासाठी ओटा, पाणी व्यवस्था, टॉयलेट ब्लॉक व लाईट सुविधा केलेली आहे.
8)जनावरे बाजार येथे बाजार समितीने टॉयलेट, पाणी आहाळ -4, जनावरे चढ उतार करण्यासाठी धक्का, जनावरे बांधण्यासाठी दावणी तसेच पार्किंग परिसर मुरूमीकरण केला आहे. जनावरे बांधण्यासाठी शेड व्यवस्था व शेतकरी, व्यापारी यांचेसाठी जारव्दारे पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. तेथील रस्ता डांबरीकरण करणेचे काम मंजुर असुन ते सुरू होणार आहे.
 9)उपबाजार मोर्विस धामोरी फाटा येथे नवीन उपबाजारास मंजुरी मिळालेली असुन भुमिपुजन झालेले आहे. सदर ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम तसेच वजनकाटा बसविण्याचे काम लवकरच पुर्ण करण्यात येवून कांदा व भुसार लिलाव खरेदी विक्रीचा शुभारंभ लवकरच सुरू होणार आहे.
 बाजार समितीने शेतमाल खरेदी विक्री व्य़वहाराच्या दृष्टीने शेतकरी हा केंद्र बिंदु मानुन बाजार आवारात आवशक त्या पायाभुत व उत्पादीत सुविधा तसेच शेतकरी हिताचे दृष्टीने आवश्य़क त्या योजना कार्यान्वीत करुन आपली सामाजीक बांधीलकी जोपासली आहे. तसेच सर्व संबंधीत घटकांसोबत समन्व़य साधुन विश्वास निर्माण करुन बाजार समिती कामकाज करीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचा बाजार समितीवर विश्वास आहे. बाजार समितीच्या माध्य़मातुन शेतकरी व व्यापारी यांना तसेच इतर घटकांना सुविधा देवुन बाजार समितीचे उत्प़न्ऩ कसे वाढवता येईल यासाठी बाजार समिती संचालक मंडळ प्रयत्ऩशील आहे. यापुढे बाजार समिती विविध विकास कामे करणार असुन उत्प़न्ऩ वाढीसाठी नविन उपक्रम राबविणार असुन शेतक-यांच्या शेतमालाच्या विक्रीमध्ये पारदर्शकता असल्यामुळे त्यातुन शेतक-यांचा निश्चित फायदा होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्य़क्त़ केला आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांना संचालक मंडळ भेट देवून तेथील चांगल्या योजना आपल्याकडे राबविता येतील का याचा अभ्यास करणार आहे. 
बाहेरील राज्यातील व स्थानिक व्यापारी यांचे स्प़र्धेतुन शेतक-यांच्या शेतमालाला वाजवी किंमत मिळते तसेच चोख वजनमाप, काटला नाही, रोख पेमेंट यामुळे बाजार समितीवर शेतक-यांचा विश्वास असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक मोठया प्रमाणात होत आहे. शेतक-यांनी आपला शेतमाल कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे विक्रीस आणुन आपला फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव  एन.एस.रणशूर यांनी सांगीतले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!