banner ads

विद्यार्थ्यांना नोकरी मिळवुन देण्यात संजीवनीचा ध्यास

kopargaonsamachar
0

 विद्यार्थ्यांना नोकरी मिळवुन देण्यात संजीवनीचा ध्यास


संजीवनीच्या प्रयत्नाने होताय ग्रामीण विद्यार्थी नोकरदार

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
 आपला पाल्य या महाकाय विश्वात  स्थिर स्थावर व्हावा, स्वावलंबी व्हावा, त्याला नोकरी मिळावी, ही पालकांची माफक अपेक्षा असते. या अपेक्षेने पालक आपल्या पाल्यांना संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये दाखल करतात. कॉलेजचे ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डिपार्टमेंट विविध कंपन्यांच्या संपर्कात राहुन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करते. अशाच  प्रयत्नातुन अलिकडेच किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीने चार व बिझिनेस नेक्स्ट कंपनीने पाच विद्यार्थ्यांची चांगल्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. अशा  प्रकारे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवुन देण्याचा ध्यास कायम ठेवला असुन पालकांचे स्वप्न पुर्ण होत आहे, अशी  माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

       किर्लोस्कर न्युमॅटिक या यांत्रिकी उत्पादनाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील क्रिष्णा  संजय राऊत, सहर्ष  उमेश  गुंजाळ,  एैश्वर्या मनोज कुंभार व कार्तिक राजेंद्र पवार यांची नोकरीसाठी निवड केली. बिझिनेस नेक्स्ट या जगभरातील बॅन्का आणि वित्तिय संस्थांना सॉफ्टवेअर सपोर्ट करणाऱ्या  कंपनीने अंतिम वर्षातील  कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या ऋतुजा शिवाजी  बेंद्रे, देवांशी  लोकेश  गुप्ता, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या स्वराज शशिकांत  लांडे, अक्षदा सोमनाथ चव्हाण व इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या ऋषिकेश  भाऊसाहेब दुबे यांची नोकरीसाठी निवड केली आहे.
         निवड झालेले सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे. संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामीण विद्यार्थी नोकरदार बनत आहेत. यामुळे पालक वर्गात मोठे समाधान आहे. अनेक पालक व्यवस्थापन, डायरेक्टर व संबंधित विभाग प्रमुख आणि शिक्षकांना भेटून महाविद्यालयाच्या प्रयत्नांबध्दल आपला अभिप्राय व्यक्त करतात. संजीवनीच्या सर्वच संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कृतिबध्द कार्यक्रम राबवितात, त्यामुळे ‘संजीवनी पॅटर्न’ पालकांना अधिक भावत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
      संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!