banner ads

शिवसेनेकडून महिलांना समाजकारण व राजकारणात मोठी संधी. --: विमल पुंडे

kopargaonsamachar
0

 शिवसेनेकडून  महिलांना समाजकारण व राजकारणात मोठी संधी. --विमल पुंडे 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 महायुतीचे शासन सर्व आघाड्यावर उत्तम काम करत असुन संरक्षण, अर्थ, व्यापार, शिक्षण, कृषी ,विज्ञान आदी सर्व क्षेत्रात आपण विकास साधत आहोत.महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जात आहेत. 
महाराष्ट्रात  बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर राष्ट्रवादी विचारावर चालणाऱ्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत महिलांना समाजकारण व राजकारणात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी केले .

त्या म्हणाल्या की आपली अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. संरक्षण क्षेत्रात आपण घेतलेल्या आघाडीचा प्रत्यय आपण नुकताच जगाला दाखवून दिला आहे. आपलं महाराष्ट्र राज्य देशात आता पुन्हा सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य बनले आहे. महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जात आहेत.

शिवसेना नेत्या निलम  गोरे, व मीना कांबळी, शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचे महिलांना देव देश धर्मासाठीचे  सतत मार्गदर्शन असते. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समाजासाठी लढणाऱ्या शिवसेनेला साथ देण्याचा महाराष्ट्रातील जनतेचा कल आहे. घराणे शाहीला थारा नसलेल्या शिवसेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळते हा इतिहास आहे.
महिलांना असणाऱ्या आरक्षणामुळे महिलांना समाजकारणात मोठा वाव आहे.  समाजकारणाची आवड असणाऱ्या चांगल्या प्रतिमेच्या महिलांनी शिवसेना महिला आघाडीत सक्रिय व्हावे असे आवाहन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!