न्यू इंग्लिश स्कूल, धामोरीचा ९६.५१ टक्के निकाल
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथिल न्यू इंग्लिश स्कूल, विद्यालयाचा इ. १० वी चा निकाल ९६.५१ टक्के लागला असुन परीक्षेस एकूण ८६ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम तीन यशस्वी विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे प्रथम कु. ताजणे सायली सचिन ९५.२० टक्के ,द्वितीय कु. खैरे वैष्णवी गोरख – ९३.४० टक्के तृतीय कु. हरळे तनिष्का नामदेव – ९२.८० टक्के या निकालात ३४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, २० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, आणि २९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मध्ये यश संपादन केले. केवळ 3 विद्यार्थी अपयशी ठरले.या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बागल एस. टी.,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय समिती, शालेय व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांच्या मार्गदर्शन लाभले .





