श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील संत सावता माळी युवक संघाच्या वतीने ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती जवळजवळ १०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुकुंद काळे जिल्हाध्यक्ष संत सावता माळी युवक संघ अहिल्यानगर प्रदीप नवले चेअरमन संजीवनी सहकारी पतसंस्था कोपरगाव ,अशोक सोपान माळवदे तालुकाध्यक्ष संत सावता माळी युवक संघ ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे ,मुख्याध्यापक प्रभाकर कदम डॉ. मनोज भुजबळ, शेखर बोरावके ,अमोल माळवदे ,योगेश ससाणे ,संतोष रांधव ,संदीप डोखे, अनंत वाकचौरे ,मनोज चोपडे ,ओंकार ओढणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रदीप नवले यांनी भूषविले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या स्पर्धेचा निकाल १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आला प्रथम क्रमांक प्रांजल संतोष कदम इयत्ता तिसरी हिने पटकावला आर्या विलास गाडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला तृतीय क्रमांक प्रणव कृष्णा बाविस्कर व समृद्धी महेश कदम यांनी पटकावला तनिष्का दत्तात्रय वाघ हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले क्रमांक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षक सोमनाथ मंडाळकर यांना उत्कृष्ट समाजकार्याबद्दल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले विद्यार्थी हे दैवत आहे लहान वयात मुलांमध्ये महापुरुषांच्या विचारांची पेरणी करणे गरजेचे आहे त्यांच्या कार्याची ओळख मुलांना व्हावी म्हणून संत सावता माळी युवक संघ समाजासाठी चांगले काम करत आहे असे मत प्रदीप नवले ,यांनी व्यक्त केले अंबादास भुसे, योगेश शिंदे, महेश कदम ,बाळू आहेर ,कराळे बेबी, लता साळवे ,पल्लवी पवार, शितल मोरे ,कविता झरेकर, चंद्रकला डांगे, भाऊसाहेब पवार, आदिनाथ जपे आदी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ मंडाळकर यांनी केले तर आभार अशोक थोरात यांनी मानले.





