banner ads

कोपरगाव कृषी विभागाची बोगस बियाणे- खत विक्रिवर करडी नजर

kopargaonsamachar
0


कोपरगाव कृषी विभागाची बोगस बियाणे- खत विक्रिवर करडी नजर

बोगस बियाणे,खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी भरारी पथक नियुक्त

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खते, जादा दराने खते आणि बियाणांची विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी कोपरगाव  तालुक्यांत  भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. बोगस माल जप्त करणे आणि संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविणे, अथवा न्यायालयात थेट खटला भरण्याचे अधिकार या पथकांना देण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यात ४५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार असून, खरीप हंगामासाठी सोयाबीन २४ हजार हेक्टर, १८ हजार हेक्टर मका, कापूस १ हजार ६०० हेक्टर, एक हजार हेक्टर, उडीद ५० हेक्टर, तर तूर १००, मूग ३५०, भुईमूग ३०० हेक्टर या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र, ऐन पेरणीच्या वेळी खत, बियाणांची होणारी साठेबाजी, तसेच बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. 
   असुन  दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात. एवढेच नव्हे तर परवानाधारक दुकानदार शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खत आणि बियाणे विक्री करण्यासाठी अन्य माल घेण्याची सक्ती करतात. अशाप्रकारे लिंकिंग करून शेतकऱ्यांना लुबाडले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी कोपरगाव तालुका कृषी
अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक तालुकास्तरीय भरारी पथक स्थापन केले आहे. दरम्यान या पथकाद्वारे कोपरगाव तालुक्यातील बियाणे, खते विक्रेत्याच्या दुकानाची तपासणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचेही कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी सांगितले .

----------
तक्रार निवारण कक्षाची स्थापना...

कोपरगाव पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी यांच्या दालनात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात कृषी अधिकारी कोष्टी यांच्यासह कृषी विस्तार अधिकारी एस. एन. यादव तसेच कनिष्ठ सहाय्यक उर्मिला धुमाळ हे कार्यरत असणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सात अशी या कक्षाची कार्यालयीन वेळ असणार आहे.

----------

भरारी पथकात असणार पाच अधिकारी...
    तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे या पथकाचे
प्रमुख आहेत. पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी सचिन कोष्टी हे सचिव असणार आहेत. तर कृषी अधिकारी रवींद्र पोटे, वैध मापन शास्त्र निरीक्षक अनुप कुलकर्णी यांच्यासह संबंधित क्षेत्रातील मंडळ कृषी अधिकारी हे सदस्य असणार आहेत. 
-------

कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व खते मिळण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खते औषधे खरेदी करावी. बनावट खते, बियाणे, औषधे अथवा खते लिंकिग याबद्दल शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

- मनोज सोनवणे, 
तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!