banner ads

कोपरगावात घरफोडीत पावणेतीन लाखाचे दागिने लंपास

kopargaonsamachar
0

 कोपरगावात  घरफोडीत पावणेतीन लाखाचे दागिने लंपास 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे येथील गोकुळ नगरी भागातील एका घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ८३ हजाराच्या मुद्देमालाची चोरी केली.


 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी येथील नर्मदा अ -२  येथील बिल्डिंग मधील विजय जवरीलाल बेदमुथा  हे शनिवार दिनांक १७ रोजी  रात्री बेडरूम मधील फॅन खराब झालेला असल्याने ते बेडरूम शेजारील हॉलमध्ये झोपलेले होते तेव्हा रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शाळेच्या भिंतीवर चढून गॅलरीच्या जाळीचे गेटचे लॉक तोडून विजय यांच्या घरात प्रवेश करत त्यांच्या बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील शेतीतील गहू विकून आणलेले दीड लाख रुपये रोख रक्कम व जुन्या बाजारभावातील चार तोळे सोन्याची विविध दागिने असा एकूण दोन लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे दरम्यान चोरी झालेल्या ठिकाणी स्वांनपथक व फींगर प्रिंट पथकाला प्राचारण करण्यात आले होते या प्रकरणी बेदमुथा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात घर फोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!