ठाकरे सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी दडीयाल
कोपरगाव विधानसभा अध्यक्षपदी किरण खर्डे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यात अहिल्यानगर जिल्हा समन्वयक म्हणून माजी कोपरगाव शहर प्रमुख कलविंदर दडीयाल यांची निवड करण्यात आली.
कोपरगाव विधानसभा अध्यक्षपदी किरण खर्डे कोपरगाव पूर्व व उत्तर विभाग तालुकाप्रमुख संजय दंडवते, दक्षिण पश्चिम तालुकाप्रमुख गंगाधर रहाणे, कोपरगाव विधानसभा मतदार संघ संघटक पदी अशोक कानडे, समन्वयक म्हणून राजू शेख आदींच्या नियुक्ती करण्यात आल्या .
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाने या निवडी जाहीर केल्याने या निवडींना महत्त्व प्राप्त झाले असुन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रंग भरणार असल्याचे दिसून येऊ लागले आहे.






