banner ads

कोपरगावातील घड्याळ दुकान लुटणारी टोळी जेरबंद

kopargaonsamachar
0

कोपरगावातील घड्याळ दुकान लुटणारी टोळी जेरबंद



दहा दिवसात लावला तपास , टोळी बिहार राज्यातील

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
चादर आडवी धरून दुकानातून लाखोंच्या चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेली बिहार राज्यातील चोरट्यांची टोळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली असून त्यांच्याकडून दहा लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये मागील १९ एप्रिल रोजी घडलेली कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या दुकानातील चोरीची घटना देखील उघडकीस आली आहे. दहा दिवसात पोलिसांनी या घटनेचा तपास लावल्याने अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संजय लालचंद जैन, वय ६१ रा.गुरूद्वारा रोड, कोपरगाव, यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असे घडयाळाचे दुकान आहे.फिर्यादी हे दिनांक १८/०४/२०२५ रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपीतांनी चादर आडवी धरून त्यांचे दुकानाचे शटर  उचकटून दुकानातील विविध कंपन्यांची घडयाळे दुकानफोडून चोरून नेले.याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे गु.र.नं.१८९/२०२५ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. 

   पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून,गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले असून त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ दिनेश आहेर,  तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.  

दि.३०/०४/२०२५ रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं १८९/२०२५ या गुन्हयाचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास, रा.घोडासहन, बिहार व त्याचे इतर ७ साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जि.पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त     झाली.पथकाने शिरूर जि.पुणे येथे संशयीतांचा शोध घेऊन 1) सुरेंदर जयमंगल दास, वय ४० वर्षे, 2) रियाज नईम अन्सारी, वय ४० वर्षे 3) पप्पु बिंदा गोस्वामी, वय ४४ वर्षे ४) राजकुमार चंदन साह, वय २० वर्षे ५) राजुकुमार बिरा प्रसाद, वय ४५ वर्षे ६) नईम मुन्ना देवान, वय ३० वर्षे ७) राहुलकुमार किशोरी प्रसाद, वय २६ वर्षे ८) गुलशनकुमार ब्रम्हानंद प्रसाद वय - २५ वर्षे, सर्व रा. घोडासहन,ता.घोडासहन, जि.मोतीहारी,राज्य बिहार असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अंगझडती घेऊन त्यांचेकडून ९,८१,०००/- रू किं.त्यात  टायटन, रागा टायटन, टायमॅक्स कंपनीची १०० घडयाळे, दोन वायफाय राऊटर, ७ मोबाईल असा एकुण १०,६२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांचेकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता आरोपी नामे सुरेंदर जयमंगल दास याने ताब्यात मिळून आलेली सर्व घडयाळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी ९) मोबीन देवान रा.घोडासहन, ता.घोडासहन, जि.मोतीहारी, बिहार राज्य (फरार) याचेसह मागील १२ -१३ दिवसापुर्वी कोपरगाव शहरातील एका घडयाळाचे शोरूममधून चोरी केले असून सदरची चोरी करताना त्यांचेकडील मोबाईल व राऊटरचा वापर केल्याची माहिती सांगीतली.तसेच गुन्हयातील इतर चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता चोरीची काही घडयाळे ही  मोबीन देवान याच्या मार्फतीने १०) मुकेश शहा रा. घोडासहन, ता. घोडासहन, जि. मोतीहारी, राज्य बिहार मो.नं. (फरार) यास सदर घड्याळे हे चोरीचे आहेत हे सांगुन कमी किमतीत विक्री केले असुन काही घड्याळे मोबीन देवान याचेकडे असल्याची माहिती सांगीतली आहे.  

ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे ? याबाबत विचारपुस करता सुरेंदर जयमंगल दास याने त्याचे वरील साथीदारांनी मिळुन मागील १५ ते १६ दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकलगेट परिसरात रात्रीचे वेळी मोबाईल शॉप फोडुन मोबाईल फोन चोरले आहेत.चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री माहिती सांगीतली.नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथील बेगमपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.८५/२०२५ बी.एन.एस.कलम ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.ताब्यातील आरोपीतांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. 
 
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,  शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!