शिर्डी येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेली भरघोस मते व त्या नंतर विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात मिळालेला विजयामुळे शिवसेनेची ताकद वाढत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खा. डॉ . श्रीकांत शिंदे यांचे आदेशानुसार व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी , राजेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार २ मे रोजी दु. २ वा. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या विचारांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या संवेदनशील पक्षप्रमुख असलेली शिवसेना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात महिला पर्यंत न्यायची आहे.
महिला आघाडीचा हा मेळावा शिवसेनाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली व पहिल्या फळीतील नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळालेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. मीनाताई कांबळी व शिवसेना प्रवक्त्या, सचिव, महिला संपर्क नेत्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
तसेच मा. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विठ्ठलराव लंघे , आमदार अमोल खताळ, सुरेखा गव्हाणे, कमलाकर कोते, नितीनराव औताडे, अनिता जगताप व इतर अनेक शिवसेना पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हान शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे व सुनीता शेळके यांनी केले आहे.








