banner ads

स्व. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करण्यात गौतम बॅक राज्यात अग्रेसर

kopargaonsamachar
0

 

स्व.  आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांना
वित्त पुरवठा करण्यात  गौतम बॅक राज्यात अग्रेसर

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

अहिल्यानगर जिल्हयात सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असणा-या गौतम सहकारी बँकेने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शना खाली व आ.आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पारदर्शक कारभाराच्या जोरावर आजवर विविध पुरस्कार मिळविलेले आहेत. त्याच बरोबर सक्षम कर्ज वाटपात देखील नेत्रदिपक कामगिरी करतांना स्व. आण्णासाहेब पाटील आर्थीक मागास मराठा विकास महामंडळ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी वित्त पुरवठा करण्यात राज्यात अग्रेसर असल्याची माहिती बँकेचे चेअरमन संजय आगवन,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.
सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यवसायीक व गरजू व्यक्तींना खाजगी सावकाराच्या पाशामधुन सोडविण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी १९७६ साली ग्रामिण भागातील लोकांसाठी गौतम बँकेची स्थापना केली. मध्यंतरीच्या काळात आलेल्या सर्वच अडचणींवर मात करून गौतम बँकेने आपला शाखा विस्तार करतांना एकूण नऊ शाखा नगर-नासिक जिल्ह्यात यशस्वीपणे सुरु आहे.  बँकेच्या स्थापनेपासुन लोक कल्याण व बँकेच्या कारभारात काटकसरीचा पांयडा पाडुन कर्मवीर शंकररावजी काळे यांनी लावलेल्या आर्थीक शिस्तीचे धडे गिरवत  विदयमान संचालक मंडळाने बँकेचा कारभार अतिशय उत्तम व पारदर्शक सुरु ठेवलेला आहे. त्यामुळे बँकेची वर्षागणीक   प्रगती होत आहे. हि प्रगती केवळ आर्थीकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिकदृष्टया देखील बँकेची प्रगती महत्वपुर्ण असून  बँकेच्या कार्यक्षेत्राच्या आर्थीक अडचणी त्यामुळे वेळेत सुटत आहे.

बँकेने कर्ज वाटपाच्या निकषांवर स्व.आण्णासाहेब पाटील मराठा आर्थीक मागास विकास महामंडळाचे माध्यमातून बँकेच्या कार्येक्षेत्रातील नऊ शाखा मधुन ग्रामिण भागातील गरीब होतकरू, सुशिक्षित बेरोजगार तरूणांना दुग्ध व्यवसाय, पशुपालन, लघुउदयोग, दवाखाना शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी आजतागायत रू.१०० कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे. काही खाती बंद होवून राहीलेली सर्व कर्जे खाती नियमितपणे  सुरू असून सर्वच कर्जदार आपल्या कर्जाचे हफ्ते वेळेत जमा करीत आहे. व स्व.आण्णासाहेब पाटील मराठा आर्थीक मागास महामंडळाकडुन नियमित व्याजाचा परतावा मिळत आहे. सन २०२४/२०२५ या आर्थीक वर्षात बँकेने अतिशय उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. बँकेचे मजबुत धोरण व व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कारभारातून हे साध्य होत असून बदलत्या काळानुसार स्पर्धेच्या युगात इंन्टरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, युपीआयसह इतर डिजीटल साधनाचा वापर प्रभावीपणे वापरून बँक ग्राहकांना सेवा पुरवित आहे. त्याचा लाभ सभासद, कर्जदार, खातेदारांनी घ्यावा असे अवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी केले आहे.  


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!