banner ads

" धाडीवाल हॉस्पिटल "येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

kopargaonsamachar
0

 " धाडीवाल हॉस्पिटल "येथे  भव्य आरोग्य शिबिर संपन्न 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर  यांच्या जन्म कल्याणक दिनाचे औचीत्य साधत कोपरगाव येथील गुरुद्वारा रोड येथे असलेल्या " धाडीवाल हॉस्पिटल " येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला .
या आरोग्य  शिबिरा  मध्ये तज्ञ डाॕक्टरांच्या मार्गदर्शनाखाली   ६५ नागरिकांची  आरोग्य तपासणी करण्यात आली.

 त्यात   हृदयरोग ,ईशीजी ,मधुमेह, व रक्तदाब तपासणी , डॉ. शशिकांत धाडीवाल ,डॉ सुशांत धाडीवाल, डॉ. पुनम धाडीवाल यांनी मोफत तपासणी करुन रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचार केले.   या शिबिरास डाॕ.भारत बंब,डाॕ.राकेश भल्ला,डाॕ.विजय क्षीरसागर,डाॕ.राजेंद्र माळी, यांनी भेट दिली. 

या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी सर्व प्रकारचे संधिवात, त्वचारोग, फुप्फुसाचे आजार, दमा, निमोनिया ,जुनाट सर्दी ,मायग्रेनचा त्रास ,यासह आयुर्वेद व पंचकर्म उपचार ,अग्निकर्म उपचार , स्ञी रोग ,वंधत्व ,पित्ताच्या व पचनांच्या तक्रारी, केसांचे उपचार व लहान बालकांसाठी 0 ते 16 वर्ष पर्यंतच्या बालकांना दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन संस्कार केले जातात या अत्याधुनिक सुविधेचा नागरिकांनी व  रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन  डॉ. शशिकांत धाडीवाल ,डॉ. सुशांत धाडीवाल व डॉ. पूनम धाडीवाल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!