banner ads

सक्षम लवांडे एम बी बी एस परिक्षेत उत्तीर्ण

kopargaonsamachar
0

 सक्षम लवांडे एम बी बी एस परिक्षेत उत्तीर्ण


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

                महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांने जानेवारी २०२५ मध्ये घेतलेल्या एम बी बी एस परिक्षेत डॉ. सक्षम राजेंद्र लवांडे हा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.

            डॉ. सक्षम लवांडे हे सोलापुर येथील डॉ. व्ही. एम शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शिकत होते. त्यांना १४०० पैकी ९४३ गुण मिळाले आहे. कोपरगांव येथील माजी सहायक आगार बस व्यवस्थापक भाउसाहेब पोटभरे यांचा तो नातु असुन सौ. सुवर्णा व प्रा. डॉ. राजेंद्र लवांडे  यांचा तो मुलगा आहे.

             डॉ. सक्षम लवांडे याने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत गुणवत्तेच्या जोरावर प्रथम टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला २०२० च्या बारावी शास्त्र शाखेचा तो टॉपर विद्यार्थी होता. त्याने पहिल्याच प्रयत्नांत वैद्यकिय प्रवेश नीट परिक्षा उत्तीर्ण करत एम बी बी एस शिक्षणासाठी सोलापुर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. त्याच्या यशाबददल आमदार आशुतोष काळे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आदिंनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!