पोहेगाव पंचक्रोशीच्या अर्थकारणात चंद्रपंढरी पतसंस्थेची मोलाची भूमिका
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सण २००२ पासून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व पोहेगाव पंचक्रोशी मध्ये लहान मोठे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी सभासदांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या चंद्रपंढरी पतसंस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चाललेली असून सर्वसाधारण नागरिकांच्या व छोट्या-मोठ्या व्यवसायींकांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे काम संस्थेचे संस्थापक चेअरमन उत्तमराव पंढरीनाथ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने व जोमाने सुरू आहे .
संस्थेच्या सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भाग भांडवलात व व्यवसायात समाधानकारक आर्थिक वाढ झालेली आहे संस्थेच्या २३ वर्षाच्या वाटचाली मध्ये सातत्याने सभासदांचा विश्वास वाढतच चाललेला असून संस्थेने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला असून यापुढेही घेत राहील असे संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ थोरात यांनी सांगितले .सामान्य नागरिक व सभासद यांचेसाठी संस्थेने आकर्षक योजना सुरू केलेल्या आहेत त्यात खातेदारांनी ही चांगला प्रतिसाद दिलेला असून संस्था नवनवीन छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायिकांना कमी व्याज दरात कर्ज सुविधा उपलब्ध करणार असल्याचे संस्थेचे मॅनेजर कैलास गुडघे यांनी सांगितले .
संस्थेने सुरू केलेल्या मोफत लॉकर सुविधा ,अत्यंत अल्प दरात व त्वरित सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध केलेल्या असून विविध कर्ज योजना ठेऊ योजनांचा सभासद व हीतचिंतकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक धनंजय औताडे यांनी केले असून संस्थेला सण २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ५५ लाख रुपये नफा झालेला आहे संस्थेच्या प्रगतीत सभासद ठेवीदार कर्जदार , दैनिक ठेव प्रतिनिधी, संस्थेचे सर्व संचालक ,व्यवस्थापक व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन उत्तमराव औताडे यांनी सांगितले .







