पोहेगाव येथे बालविवाह रोखण्यात यश
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सामाजिक कार्यकर्ते तसेच बालविवाह मुक्त भारत माझं गाव बालविवाह मुक्त गाव अभियान राबवणारे डॉ. अशोक गावित्रे यांच्या प्रयत्नातून हा बालविवाह रोखण्यात आला असून यासाठी महिला बालकल्याण अधिकारी रूपाली धुमाळ तसेच गटविकास अधिकारी संदिप दळवी , महिला समुपदेशक वैशाली झाल्टे ,अंगणवाडी सुपरवायझर लता येडेकर, ग्रामसेवक राजेंद्र टिळेकर, सरपंच अमोल ओताडे तसेच अंगणवाडी सेविका उज्वला भालेराव ,शिर्डी पोलीस स्टेशनचे पीआय गलांडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोराणे आदींचे सहकार्य लाभले .
सदर मुलीचा साखरपुडा झालेला होता व लग्नाची तयारी सुरू होती ती अल्पवयीन असल्यामुळे लग्न केल्यास काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली व त्यांचे समुपदेशन करून सदर विवाह रद्द करून मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नसल्याचे मुलीचे आई-वडील यांनी सांगितले तसेच ग्राम बाल संरक्षण समिती समोर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार असल्याचे लिहून देखील दिले असून मुलीने देखील पुढे शिकायचे असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली अठरा वर्षाखालील मुलीचा व २१ वर्षाखालील मुलाचा विवाह करणे म्हणजे बालविवाह असून तो गुन्हा आहे कमी वयात मुलीची गर्भधारणा झाल्यास आई व बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो बाळाची वाढ कमी होऊ शकते त्यामुळे वय पूर्ण झाल्यावरच पालकांनी योग्य वेळ येताच विवाह करणे अपेक्षित आहे गावात बालविवाह होऊ नये यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून सरपंच ,पोलीस पाटील ,ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका यांची प्राथमिक जबाबदारी आहे या समितीने बालविवाह होत असल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक यांच्यामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षा ला माहिती देणे आवश्यक आहे ,बालविवाह लावणाऱ्या पुरोहितांस सह मंडपवाले, आचारी छायाचित्रकार ,वाद्यांची ऑर्डर घेणाऱ्या सह नातेवाईकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो बालविवाह प्रथा ही बालहक्क विरोधी असून बालविवाह प्रतिबंध अधिनियम २०१६ नुसार असे बालविवाह बेकायदेशीर ठरतात १०९८किंवा ११२ या टोल फ्री क्रमांक आवरून माहिती दिल्यास तक्रार ची दखल घेऊन कारवाई केली जाते राज्यात मागील सहा वर्षात ५४२१ बालविवाह थांबविण्यात यश आले असून ४०१ एफ आय आर दाखल करण्यात आले आहे .अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात अनेक सामुदायिक विवाह आयोजित केले जातात यामध्ये देखील बालविवाह मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते याबद्दल आपल्याला माहिती मिळाल्यास त्वरित १०९८ या नंबर वरती कॉल करण्याचे आवाहन डॉअशोक गावित्रे यांनी केले आहे.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत.
निर्मल भवन येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीसंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले.





