उपजिल्हा रुग्णालय व न्यायालयाच्या ईमारतीचे कामे वेळेत पूर्ण करा-आ. आशुतोष काळे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला गती देतांना कोपरगाव शहरातील अनेक महत्वाच्या शासकीय कार्यालयांच्या इमारतींना देखील निधी दिला आहे. यामध्ये दिवाणी न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत, पंचायत समिती इमारत आदी इमारतींचा समावेश असून या सर्व इमारतींचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यापैकी दिवाणी न्यायालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी केली. काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी सुविधा असणंही तेवढंच गरजेचं असल्याचे सांगत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी सांगितले की, माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी निधी देवून ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कोपरगावची आरोग्य व्यवस्था सुरळीत केली परंतु त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय राहून गेले होते. परंतु कोविडच्या काळात उपजिल्हा रुग्णालयाची किती गरज आहे हे सर्वांनी अनुभवले आहे. आपल्यापासून जिल्हा रुग्णालय जवळपास १०० किलोमीटर पेक्षा जास्त दूर असल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावू शकत नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची होणारी अडचण दूर करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची उणीव भरून काढत अथक प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयाला मजुरी मिळवित २८.८४ कोटी रुपये निधी उपजिल्हा रुग्णालयास मिळविला आहे.
हे उपजिल्हा रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होवून नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माझे या कामावर बारीक लक्ष आहे. काम करण्यासाठी मुबलक जागा असून वेगाने काम करून पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम पूर्ण करून दिलेल्या मुदतीत उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करा.
दिवाणी न्यायालयाच्या इमारतीसाठी दिलेल्या ३८.६३ निधीतून मागील एक वर्षापासून काम सुरु आहे परंतु सुरु असलेल्या कामाला अपेक्षित वेग नाही.सध्या न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये एकाच ठिकाणी अनेक न्यायालयांचे कामकाज सुरु असल्यामुळे कामकाज करतांना अडचणी येत आहेत. तसेच न्यायालयाच्या कामा संदर्भात येणाऱ्या मतदार संघातील नागरीकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे न्यायालयाच्या इमारतीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करून लवकरात लवकर काम पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सबंधित ठेकेदाराला दिल्या.
यावेळी डॉ. अजय गर्जे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गिरीश गुट्टे. डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप. डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. संजय उंबरकर. डॉ. अमोल अजमेरे, सचिन जोशी, सुजय भगरे, वीरेंद्र वाकचौरे, समीर वर्पे,ॲड. विद्यासागर शिंदे, ॲड. शंतनू धोर्डे, ॲड. अशोकराव वहाडणे, ॲड. शिरीष लोहकणे, ॲड. भास्करराव गंगावणे, ॲड. मनोहर येवले, ॲड. सुयोग जगताप, ॲड. मनोज कडू, ॲड. एस.एस. वाघ, ॲड. ए.डी. टुपके, ॲड. ए.जी. देशमुख, ॲड. डी.जी. देवकर, ॲड..सुरेश मोकळ, ॲड. योगेश खालकर, ॲड. जी.बी. भोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वर्षराज शिंदे, प्रसाद वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.