banner ads

कोपरगाव येथे मराठा सोयरीक संस्थेचा मोफत वधू वर मेळावा

kopargaonsamachar
0

 कोपरगाव येथे मराठा सोयरीक संस्थेचा मोफत वधू वर मेळावा


 सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचे आयोजन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 सकल  मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने  विनय भगत व मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक  अशोक कुटे यांनी दिली आहे.

     हा मेळावा नेहमीप्रमाणे मोफत असून ९५ वा मेळावा गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट हॉल मध्ये कोपरगाव शहर जिल्हा आहिल्यानगर येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त वधु वर पालकांनी या मेळाव्यात  सहभागी व्हावे असे आवाहन   विकास आढाव, भरत मोरे, अनिल गायकवाड,शिवाजी ठाकरे, अमित आढाव,ॲड. योगेश खालकर, अशोक आव्हाटे , बबलू वाणी, संदीप डुमरे,विजय जाधव, राजेंद्र वाकचौरे , मनोज नरोडे, विश्वास मुराडे, नंदू डांगे, वडांगळे सर,विनय भगत आदींनी केले आहे.
   या मेळाव्यासाठी येताना वधू- वरांनी स्वतः आधार कार्ड झेरॉक्स, बायोडाटा घेऊन पालकांसह  मेळाव्यास  यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ९५९५२०३९९१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे* 
     आज काल मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, त्यांचे लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न  करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही.म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची दिवसेंदिवस गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत ९४ यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहेत. या संस्थेकडून आतापर्यंत ४५०० लग्न पार पाडलेले आहेत. त्यापैकी ६००लग्न हे विधवा,विदुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत.धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली शासनमान्य अशी ही संस्था आहे.
   तरी या मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!