कोपरगाव येथे " धाडीवाल हॉस्पिटल" चा शानदार शुभारंभ
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड भाजी मार्केट जवळ डॉक्टर सुशांत शशिकांत धाडीवाल व डॉक्टर पूनम सुशांत धाडीवाल यांच्या " धाडीवाल हॉस्पिटल" चा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला .
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी डाॕ.विवेक सुर्यवंशी,डाॕ.जयंत राठी,डाॕ.संदिप मुरुमकर,डाॕ.चंद्रशेखर आव्हाड,डाॕ.संदिप वाबळे,डाॕ.सोनम वाबळे,डाॕ.सतिष अजमेरे, डाॕ.कृष्णा फुलसुंदर, डाॕ.तुषार गलांडे,डाॕ.रामदास आव्हाड,डाॕ.मयुर गंगवाल,डाॕ.पंकज बुब,डाॕ.आभा बुब,डाॕ.नितीन झंवर,डाॕ.योगेश कोठारी,डाॕ.रमेश कोठारी,डाॕ.मनोज बगा,डाॕ.समीर शहा,डाॕ.निलेश काबरा,डाॕ.नरेंद्र भट्टड,डाॕ.रमेश सोनवणे , आदींसह शहर व तालुक्यातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत व आभार डाॕ.शशिकांत धाडीवाल,सौ.सुषमा धाडीवाल,डाॕ.सुशांत धाडीवाल,डाॕ.पुनम धाडीवाल,यांनी मानले.
आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक सर्व सोयी-सुविधेने रुग्ण सेवेसाठी रुजु झालेल्या या "धाडीवाल हाॕस्पिटल" मध्ये डॉ. सुशांत धाडीवाल व डॉ. पूनम धाडीवाल या तज्ञ डाॕक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उच्च रक्तदाब , मधुमेह ,त्वचारोग ,सर्व प्रकारचे संधिवात ,हृदयरोग तपासणी ,फुपुसाचे आजार, दमा ,निमोनिया ,जुनाट सर्दी, मायग्रेनचा त्रास, साथीचे आजार ,मलेरिया ,डेंग्यू ,टायफाईड, चिकनगुनिया या व इतर आजारांचे निदान व उपचार सह स्टेपलर चे व साधे टाके सुविधे बरोबरच आयुर्वेद औषधी व पंचकर्म उपचार, अग्निकर्म उपचार ,आहार मार्गदर्शन ,स्ञी रोग ,वंधत्व ,पाठीच्या मणक्याचे आजार ,पित्ताच्या व पचनाच्या तक्रारी ,केसांचे आजार ,मासिक पाळीचे आजार ,स्थूलपणा, थायरॉईड , स्ञियांच्या समस्या व निदान याबरोबरच ० ते बारा वर्षापर्यंतच्या बालकांना दर महिन्याच्या पुष्प नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन संस्कार करण्याची सुविधा या सुवर्ण प्राशन डोस मुळे ० ते १२ वर्षापर्यतच्या बालकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते ,बालकांची स्मृती, एकाग्रतात ,ग्रहण शक्ती, बुद्धी ,व मेधा, वाढण्यासाठी स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी बालकांचा वर्ण ,उंची ,पचन सुधारणे मुलांचा सर्वागिन विकास होण्यासाठी, निकृष्ट आहार व रासायनिक खतामुळे होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी सुवर्णप्राशाने चे विशेष डोस देण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे डाॕ.शुशांत व डाॕ.पुनम धाडीवाल यांनी सांगितले असुन
सुवर्ण प्राशनचा प्रथम डोस ६ एप्रिल २०२५ रोजी दिला जाणार असून पहिला डोस हा मोफत दिला जाणार आहे .या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन " धाडीवाल हाॕस्पिटल " च्या वतीने करण्यात आले आहे.










