banner ads

विवेक कोल्हे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

kopargaonsamachar
0

 विवेक कोल्हे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय


कोपरगाव -- लक्ष्मण वावरे
 पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक नागरिकांनी आपले प्राण गमावले. देश दुःखात असताना या पार्श्वभूमीवर २७ एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी घेतला आहे.

देशातील विविध राज्यांमधून पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना टार्गेट करत करण्यात आलेला हा कायरतापूर्ण हल्ला केवळ अमानुष नव्हे, तर मानवी मूल्यांनाही काळिमा फासणारा आहे.या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून नागरिकांच्या मनात तीव्र वेदना आणि दुःख आहे. या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांनी एक भावनिक आणि सुसंवेदनशील निर्णय घेतला आहे.या हल्ल्यात प्राण गेलेल्या देश बांधवांप्रति श्रद्धांजली त्यांनी व्यक्त केली आहे.

२७ एप्रिल हा त्यांचा वाढदिवस असून दरवर्षी या दिवशी युवक,कार्यकर्ते, सहकारी, उद्योजक,शेतकरी बांधव आणि हितचिंतक मोठ्या उत्साहाने शुभेच्छा देतात. मात्र यंदा, देशावर आलेल्या या दुःखद प्रसंगामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या दिवशी कोणताही सार्वजनिक आंदोत्सव कार्यक्रम, स्वागत समारंभ किंवा जल्लोष केला जाणार नाही. तसेच हार, बुके, केक किंवा फ्लेक्सच्या स्वरूपातील शुभेच्छा कुणीही देऊ नयेत असेही आवाहन केले आहे.

त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जेव्हा देश शोकसागरात आहे, तेव्हा वैयक्तिक आनंद साजरेपणाला थांबवणे ही आपली नैतिक जबाबदारी असते.तुमचा आशीर्वाद आणि साथ ती नेहमी माझ्यासोबत राहिली आहे आणि पुढेही राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!