भारतीय लहुजी सेनेच्या जिल्हा प्रमुख पदी परशुराम साळवे यांची नियुक्ती
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
भारतीय लहुजी सेनेच्या अहिल्यानगर युवा जिल्हाप्रमुख पदावर कोपरगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते परशुराम साळवे यांची भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी निवड केली निवडीचे पञ श्री साळवे यांना देण्यात आले आहे.भारतीय लहुजी सेना जय लहुजी हा नारा घेऊन महाराष्ट्रात गाव कुसाबाहेर असलेल्या सामाजिक आर्थिक न्यायापासून उपेक्षित असलेल्या समाज संघटक करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यास क्रांती प्रणव बनवत आहे हे काम करत असताना त्यांच्या मागे नेतृत्व विकसित करावयाचे आहे या उद्देशाने संघटनेची बांधणी करण्याकरिता अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व अधिकार परशुराम साळवे यांना देण्यात आले आहेत .भारतीय लहुजी सेना सामाजिक संघटनेचे काम करीत असताना समाजाच्या न्याय हक्कासाठी परशुराम साळवे यांना काम करावे लागणार असुन केलेले काम वेळोवेळी संघटनेच्या वरिष्ठ कार्यालयात सादर करावे लागणार असल्याचेही दिलेल्या नियुक्ती पञात म्हटले आहे या निवडी बद्दल प्रतिक्रिया देताना परशुराम साळवे म्हणाले की संघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली असुन या निवडी द्वारे मला समाजाची सेवा व काम करण्याची संधी मिळाली पदाच्या माध्यमातून मी समाज्यासाठी समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करुन संघटनेच्या बांधणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्नशिल राहणार असल्याचे भारतीय लहूजी सेनेचे जिल्हा प्रमुख परशुराम साळवे यांनी सांगितले .






