ब्रम्हलीन स्वामी लखनगिरी महाराज यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमीत्त ज्ञानेश्वरी पारायण,
किर्तनमहोत्सव व सत्संग सोहळाकोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
दक्षिणकाशि गोदावरी नदीकाठावरील तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील कांचनवाडी व विभांडक ऋषी आश्रमात महान तपस्वी ब्रम्हलीन स्वामी लखनगिरी महाराज यांचा एकोणिसावा पुण्यतिथी सोहळा ९ ते १६ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव व विविध धार्मीक कार्यक्रमाने संपन्न होत असुन या पुण्यतिथीची सांगता १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ह.भ.प. श्रीकृष्णकृपांकित डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ९ एप्रिल रोजी सकाळी ८.३५ वाजता ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभानिमीत्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते दीप व कलशपुजन, हभप राघवेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते ग्रंथपुजन होईल. सकाळी ११ते १ याकाळात बालकिर्तनकार हभप ओमकार महाराज (९एप्रिल) हभप लहु महाराज कराळे (१० एप्रिल) . हभप मनसुख महाराज दहे (११ एप्रिल), हभप जालिंदर महाराज शिंदे (१२ एप्रिल), हभप हरिनाथ डंगारे (१३ एप्रिल), हभप संदिप महाराज वाकचौरे (१४ एप्रिल), श्री श्री १००८ महामंडलेश्वर काशिकानंद महाराज (१५ एप्रिल), यांचा किर्तन महोत्सव साजरा होत आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता स्वामी लखनगिरी महाराजांच्या मुर्तीस ब्रम्हवृदांच्या मंत्रघोषात व विधीज्ञ वसंतराव शंकरराव कपिले यांच्या हस्ते महामस्तकाभिषेक, महापुजा संपन्न होईल.
या पुण्यतिथी सप्ताह काळात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, श्री श्री १००८ गणेशानंद सरस्वती महाराज, श्रध्दानंद महाराज महांकाळ वडगांव, गोदावरी धामचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर काशिकानंद सरस्वती महाराज, गोपालनंद महाराज, जंगलीदास माठली, आचार्य भगवान शास्वी महाराज, प. पू. भगवतानंदगिरी महाराज, हभप रामदास महाराज वाघ आदि संत महंत ब्रम्हलिन स्वामी लखनगिरी महाराज समाधी मंदिर स्थानावर उपस्थित राहणार आहेत. कीर्तन सप्ताह काळात विविध दानशूर भक्तांनी महाप्रसाद पंगत ठेवल्या आहेत.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी तनमनधनाने सहकार्य करून किर्तन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकमठाण पंचकोशीतील लखनगिरी महाराज भक्त मंडळाचे सर्व सहकारी भाविकांनी केले आहे. पंचक्रोशीतील संवत्सर, कोकमठाण, सडे, पढेगांव, कासली, कोपरगांव बेट, जेऊरकुंभारी, जेऊरपाटोदा, माळवाडी, कारवाडी, शिंगवे, कुंभारी, भोजडे आदि गावातील भजनी मंडळींनी किर्तन महोत्सव यशस्वीतेसाठी उपस्थित राहुन तन मन धनाने सहकार्य करावे.





