banner ads

साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी

kopargaonsamachar
0

 साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी


सूर्यतेज संस्थेचा उपक्रम, 
ज्योती पतसंस्था व साईभक्तांचा सहभाग.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
      सूर्यतेज संस्था,कोपरगांव वतीने ज्योती पतसंस्था कोपरगाव यांचे सहभागातून स्वच्छ भारत अभियान,वन महोत्सव स्वच्छता-जलशक्ती- वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत श्री रामनवमी उत्सव निमित्ताने कोपरगांव ते शिर्डी रस्त्यावर सलग अकराव्या वर्षी भाविकांना खाद्य व पेय पदार्थ वाटप केंद्रावर मोफत कचरापेटी उपलब्ध करून दिली आहे.


सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या अभियानाला बी.एस.एन.एल.चे संचालक व ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अँड. रविकाका बोरावके,वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ.संदिप मुरुमकर,प्रसिध्द व्यापारी अजित शिंगी, सेवानिवृत्त नायब तहसिलदार खिंवराज दुशिंग,सामाजिक कार्यकर्ते संदिप ठोके,स्वच्छ व हरितचे आनंद टिळेकर, मंगेश भिडे, सचिन कुलकर्णी,  टिनू आमले, अनंत गोडसे,महेश थोरात,आकाशवाणीचे विजय कासलीवाल,रणजित पंडोरे,राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी,विद्यार्थीनी,स्वच्छतादूत
पथक,महाराष्ट्र हरित सेना,यांचे सहकार्य लाभले आहे.

सूर्यतेज संस्थापक व महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत शिर्डी उपविभाग व कोपरगाव तालुक्यात अनेक उपक्रम राबविले आहे...यात सुमारे हजारो विविध झाडांचे मोफत वितरण आणि वृक्षारोपण करण्यात आले आहे.
कोपरगांव ते शिर्डी या सोळा किमी महामार्गावर श्रीरामनवमी उत्सवानिमित विविध ठिकाणच्या अनेक साई पालखी पायी चालून मार्गस्थ होतात.या भाविकांना
साईभक्तांकडून श्रध्देने खाद्य व पेय पदार्थ वाटप केले जाते.साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला कोपरगांव ते शिर्डी पवित्र मार्गावर स्वच्छता रथातून तात्पुरत्या स्वरूपाच्या सुमारे २५० कचरापेटी सुमारे २२ केंद्रावर उपलब्ध करून देवून
कचरापेटी द्वारे कचरा संकलन अभियान राबविण्यात आले.कचरापेटी वाहतुकीसाठी "स्वच्छता 
रथ" तयार करण्यात आला होता. तसेच लाऊडस्पीकरवर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली होती.गेल्या दोन दिवसापासून मोफत कचरापेटी वाटप करण्यात आली आहे. कचरापेटीवर " आपण सारे साई भक्त साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला पालखी मार्ग स्वच्छ ठेवू या. " या संदेशाबरोबर ओला,सुका,सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिक आणि घातक कचरा वर्गीकरण या स्वच्छता प्रबोधन संदेश सोबत उन्हाच्या तिव्रतेमुळे व्याकूळ पक्षांना खाद्य आणि पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरितसेनेचा झाडे लावा-झाडे जगवा हा वृक्षसंवर्धन संदेश,माझी वसुंधरा अभियान संदेश दिला आहे.
या अभियानाला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे,संदिपकुमार भोसले यांचेसह स्वच्छताप्रेमी साईभक्त यांनी सदिच्छा भेट देवून कौतुक केले आहे. 
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून झालेल्या स्वच्छता अभियानात स्वच्छताप्रेमी यांचेसह साई स्वयंसेवकांच्या सहकार्याने साई पालखी रस्ता स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गेल्या अकरा वर्षाच्या या अभियानामुळे साई पालखी रस्त्यावरुन शिर्डीत येणाऱ्या भाविकात स्वच्छतेविषयी जागृतता निर्माण झाली असून कचराचे ढिग आटोक्यात येवून सकारात्मक परिणाम दिसू लागले आहे.स्वच्छता अभियानाचे साईभक्तांनी स्वागत केले असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!